जाहिरात

Diwali Tradition: 'या' गावात दिवाळीमध्ये असते स्मशान शांतता, काय आहे शेकडो वर्षांची भीतीदायक पंरपरा?

Diwali 2025: 'या' कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तर गावात कोणते तरी संकट येते किंवा अकाली मृत्यू (Accidental Death) होतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

Diwali Tradition: 'या' गावात दिवाळीमध्ये असते स्मशान शांतता, काय आहे शेकडो वर्षांची भीतीदायक पंरपरा?
Diwali 2025: या गावात अनेक दशकांपासून दिवाळी साजरी होत नाही. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Diwali 2025: संपूर्ण भारतात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. सर्व जण दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात आणि मोठ्या हर्षोल्लासाने तो साजरा करतात. अनेक ठिकाणी दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. मात्र, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एका गावात दिवाळीच्या दिवशी पूर्णपणे शांतता असते. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर (Hamirpur) जिल्ह्यातील हे 'सम्मू' गाव (Sammu Village) गेल्या अनेक दशकांपासून दिवाळीचा सण साजरा करत नाही. आजही या गावाची ओळख ‘शापित गाव' (Cursed Village) म्हणून आहे.

काय आहे कारण?

जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या सम्मू गावातील लोक दिवाळीच्या दिवशी ना कोणते पदार्थ बनवतात, ना घर सजवतात, ना कोणताही उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात. या गावातील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, जर कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, तर गावात कोणते तरी संकट येते किंवा अकाली मृत्यू (Accidental Death) होतो. या भीतीमुळे येथील लोक दिवाळी साजरी करण्याची हिंमत करू शकत नाहीत.

( नक्की वाचा : Diwali Tips and Tricks: मोठी समस्या संपली! घरात उंदीर असतील तर न मारता पळवून लावण्यासाठी लगेच वापरा ही ट्रिक )
 

शेकडो वर्षांचा इतिहास

गावातील वयोवृद्धांच्या म्हणण्यानुसार, हा शाप शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. असे सांगितले जाते की, पहिल्या महायुद्धाच्या (World War I) वेळी दिवाळीच्या दिवशीच गावातील एक महिला आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली होती. त्याच वेळी, सैन्यात असलेल्या तिच्या पतीचे निधन झाले होते आणि ग्रामीण लोक त्यांचा मृतदेह घेऊन परत येत होते. गर्भवती असलेल्या त्या महिलेला हे दृश्य सहन झाले नाही आणि तिने आपल्या पतीसोबत 'सती' (Sati) जाण्याचा निर्णय घेतला. सती जाताना त्या महिलेने संपूर्ण गावाला शाप दिला की, 'या गावात कधीही दिवाळी साजरी होणार नाही.' तेव्हापासून आजपर्यंत गावातील लोकांनी हा सण साजरा केलेला नाही.

सम्मू गावातील रहिवासी रघुवीर सिंह रंगडा यांनी सांगितले, "आमच्या पूर्वजांच्या काळापासूनच दिवाळी साजरी केली जात नाही. जो कोणी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर गावात कोणाचा तरी मृत्यू होतो किंवा एखादी अप्रिय घटना (Untoward Incident) घडते." ते पुढे म्हणाले की, "अनेकवेळा लोकांनी या शापातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला, पूजा-पाठही केले, परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही."
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com