
JCB Vs Elephant Viral Video:
जेसीबी आणि हत्ती आमने-सामने आले तर कोण जिंकेल? कुणाची ताकद जास्त आहे? असं विचारलं तर कदाचित अनेकांना उत्तर देण्यासाठी विचार करावा लागेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहिला तर या प्रश्नांचं उतर काही सेकंदा मिळू शकेल. व्हिडीओत हत्ती आणि जेसीबी आमनेसामने आले आहेत. संतापलेल्या हत्तीने जेसीबीला जोरदार धडक दिली.
व्हिडीओ दिसत असलेल्या दृश्यांमध्ये दिसत आहे की, हत्ती समोर उभ्या असलेल्या जेसीबीला जोरदार धडक देतो. त्यानंतर जेसीबी एका बाजूने हवेत तरंगताना दिसत आहे. मात्र या धडकेत हत्तीला इजा देखील झाली असावी. कारण त्यानंतर हत्ती मागे फिरतो. मात्र चालक जेसीबीला हत्तीच्या मागे नेतो. त्यानंतर हत्ती तिथून पळताना दिसत आहे. काही लोक देखील हत्तीच्या मागे धावताना दिसत आहेत.
(नक्की वाचा - Viral News : सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'Tararara गर्ल' कोण आहे?)
VIDEO पाहा
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओवर युजर्स देखील विविध कमेंट देत आहेत. अशा घटना जंगलात नेहमी पाहायला मिळतात, असे काही युजर्सचं म्हणणं आहेत. लोक मशीनच्या साहायाने प्राण्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांतर अनेकदा प्राणी असे हल्ले करतात. अनेक युजर्स हत्तीच्या बाजूने उभे असल्याचं दिसून येत आहे. लोकांकडून प्राण्याचा त्रास दिला जात असल्याचं अनेकांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.
(नक्की वाचा- Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video)
एका युजरने व्हिडिओवर लिहिले की, "हत्तीला चिथावणे चुकीचे होते, माणसांनी जंगलातील प्राण्यांची शांतता भंग करू नये." तर दुसऱ्या युजरने म्हटले की, "यावरून असे दिसून येते की आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, अन्यथा त्याचे परिणाम घातक असू शकतात."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world