
सध्या सोशल मीडियावर एका चीनी मुलीचा ट्रम्पेट वाजवतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. गाओ यिफेई (Gao Yifei) असे या मुलीचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या तरुणीला लोकांना "तरारारा गर्ल" असे नाव दिले आहे. गाओ यिफेईचा पहिला व्हिडिओ WeChat वर अपलोड करण्यात आला होता, जो नंतर Facebook, YouTube आणि Instagram सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता.
(नक्की वाचा- Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video)
गाओ यिफेई कोण आहे?
गाओ यिफेई एक ट्रम्पेट वादक आहे. ती चीनी गायक झाओ लेईच्या बँडचा भाग आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये ती ट्रम्पेट वाजवताना दिसत आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गाओ यिफेईने ट्रम्पेटवर 'टाइम ऑफ अवर लाईव्ह्स'ची धून वाजवून लोकांची मने जिंकली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झाओ लेईने हे गाणे 2015 मध्ये रिलीज केले होते. परंतु गाओ यिफेईच्या ट्रम्पेट परफॉर्मन्सने ते पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. विशेष बाब म्हणजे गाओ यिफेई स्वतः कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. कारण चीनमध्ये फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या साइट्सवर बंदी आहे.
( नक्की वाचा : Priyanka Chopra : अंतर्वस्त्रे दाखवली तरच...प्रियंका चोप्रानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव ! )
आणखी एका युजरने लिहिले की, या मुलीने फक्त 10 सेकंद ट्रम्पेट वाजवले, परंतु तिचा अभिनय इतका सुंदर होता की संपूर्ण जग तिची प्रशंसा करत आहे. ती प्रत्येक कौतुकास पात्र आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world