जाहिरात
Story ProgressBack

'गुलाबी साडी...' गाण्यावर तरुणाचा लोकलमध्ये भन्नाट डान्स, 6.4 कोटी जणांनी पाहिलेला VIDEO पाहिला का?

नोएल रॉबिन्सन या जगप्रसिद्ध कॉनटेन्ट क्रिएटर हा रील केला आहे. इन्स्टाग्रामवर noelgoescrazy नावाने त्याचं आकाऊंट आहे.

Read Time: 2 min
'गुलाबी साडी...' गाण्यावर तरुणाचा लोकलमध्ये भन्नाट डान्स, 6.4 कोटी जणांनी पाहिलेला VIDEO पाहिला का?
Viral Video:

सोशल मीडियावर सध्या 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं तुफान व्हायरल होत आहे. गुलाबी साडी गाण्यावर अनेकांनी रील्स देखील तयार केल्या आहेत. असाच एक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एकजण लोकलमध्ये गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अत्यंत मजेशीर असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे.   

पाहा VIDEO

नोएल रॉबिन्सन या जगप्रसिद्ध कॉनटेन्ट क्रिएटरने हा रील केला आहे. इन्स्टाग्रामवर noelgoescrazy नावाने त्याचं अकाऊंट आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की नोएल क्रीम कलरचं जॅकट घालून गुलाबी साडी गाण्यावर लोकलमध्ये डान्स करत आहे. रीलच्या सुरुवातील नोएल पडण्याची अॅक्टिंग करतो. त्यानंतर एकजण त्याला सावरण्यासाठी पुढे येतो. मात्र लगेच तो डान्स करुन लागते. 

(नक्की वाचा -आमदाराने मतदाराच्या लगावली कानशिलात, मिळालं जशास तसं उत्तर; Video Viral)

नोएलचा जबरदस्त डान्स पाहून लोकलमधील प्रवासी देखील टाळ्या वाजवू लागतात. एका व्यक्तीचं नोएलच्या डान्सकडे लक्ष नव्हतं. त्यावेळी नोएलने त्याच्या हातातून फोन खेचत त्याच्यासोबत मस्तीदेखील केली. नोएलचा हा रील इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. नोएलच्या या व्हिडीओवर आतापर्यंत 6 कोटी 43 लाख व्ह्युज मिळाले आहेत. तर 38 लाख लाईक्स तर 20 हजारहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. 

(नक्की वाचा: ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती)

पाहा VIDEO

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination