- चंबा जिले के ऐतिहासिक चौगान मैदान में रामलीला मंचन के दौरान वरिष्ठ कलाकार अमरेश महाजन की मौत हो गई
- अमरेश महाजन पिछले 23 वर्षों से रामलीला में दशरथ और रावण की महत्वपूर्ण भूमिकाएं निभा रहे थे
- मंगलवार रात दशरथ दरबार के दृश्य के दौरान उनका स्वास्थ्य बिगड़ा और वे बेहोश होकर गिर पड़े
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी रामलीला सुरू असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ऐतिहासिक चौगान मैदानावर सुरू असलेल्या श्रीरामलीलेत राजा दशरथाची भूमिका करत असलेल्या ज्येष्ठ कलाकार अमरेश महाजन यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या अनपेक्षित शोकांतिकेमुळे कलाकार आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंदाजे 70 वर्षीय अमरेश महाजन हे गेल्या 23 वर्षांपासून या रामलीला मंचनात दशरथ आणि रावणाच्या महत्त्वाच्या भूमिका करत होते.
मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. रामलीलेत दशरथ दरबारचे दृश्य सुरू असताना अमरेश महाजन पूर्ण ऊर्जेने अभिनय करत होते. त्याचवेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध होऊन रंगमंचावर कोसळले. सुरुवातीला प्रेक्षकांना आणि इतर कलाकारांना हा अभिनयाचाच भाग वाटला.
हिमाचल प्रदेश के चंबा में आयोजित रामलीला में दशरथ का रोल प्ले कर रहे 73 साल के अमरेश की अचानक मौत हो गई। उन्होंने इस बार पहले की कह दिया था कि ये उनकी आखिरी रामलीला होगी। राम–सीता स्वयंवर से पहले दशरथ दरबार के दौरान ये घटनाक्रम हुआ। pic.twitter.com/oBFoqslcEA
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 24, 2025
मात्र, ते उठले नाहीत तेव्हा इतर कलाकार घाबरले. त्यांनी तात्काळ महाजन यांना जवळच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, चंबा येथे दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण रामलीला मंचन आणि चंबा शहरावर शोककळा पसरली आहे. श्री रामलीला क्लब चंबाचे अध्यक्ष स्वपन महाजन यांनी सांगितले की, "अमरेश महाजन हे आमच्या क्लबचे एक महत्त्वाचे सदस्य होते आणि रामलीलेत त्यांची भूमिका नेहमीच प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असायची. त्यांच्या अचानक जाण्याने रामलीला मंचन आणि संपूर्ण चंबा शहराला मोठा धक्का बसला आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world