जाहिरात

How To Make Tea In Pressure Cooker: शेफने कुकरमध्ये चहा बनवला, लोकांना व्हिडीओ पाहून ठसका लागला

How To Make Tea In Pressure Cooker: ज्याला स्वयंपाकातील काहीच कळत नाही ती व्यक्ती कुकरमध्ये चहा बनविते असा बहुतांश लोकांचा समज आहे. आता एका शेफनेच कुकरमध्ये चहा बनविल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनलाय.

How To Make Tea In Pressure Cooker: शेफने कुकरमध्ये चहा बनवला, लोकांना व्हिडीओ पाहून ठसका लागला
  • यमनने कुकरमध्ये चहा बनवण्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून तो सध्या लाखो लोकांनी पाहिला आहे
  • कुकरमध्ये चहा बनविल्याने त्याला दम फ्लेवर येतो आणि वेळही कमी लागतो असे यमनने सांगितले आहे
  • या व्हिडीओवर लोकांचे वेगवेगळे प्रतिक्रिया असून काहींना ही आयडिया आवडली तर काहींनी टीका केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे असे अनेक चेहरे प्रकाशझोतात आले ज्यांना इतकी प्रसिद्धी मिळणं पराकोटीची अशक्य बाब होती. सोशल मीडियावर व्ह्यूज, लाईक, कॉमेंट मिळवण्यासाठी काही मंडळी सवंग गोष्टी करत असतात. कोणी गटाराचं पाणी पीतं, कोणी विचित्र कपडे घालून फिरतं तर कोणी फक्त शिवीगाळ करत सुटतं. Facbook वर कुकींग शुकींग (Cooking Shooking Facebook Page) नावाचं एक पेज आहे. या पेजवर विविध रेसिपी सांगितल्या जातात. या पेजचे 52 लाख फॉलोअर्स असून अनेकांनी अभिप्राय देताना म्हटलंय की या पेजवर अवघड वाटणाऱ्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितल्या जातात. यमन अगरवाल (Yaman Agarwal) या तरुण शेफचे हे फेसबुक पेज आहे. यमनने एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलाय जो आतापर्यंत 33 लाख लोकांनी बघितला असून यावर दीड हजाराहून अधिक कॉमेंटस आहेत. 'यमनने Cooker Me Chai kaise banae,2 सीटी में दम वाली चाय, CookingShooking Masala Tea Recipe' या नावाने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 'कुकरमध्ये चहा कसा बनवायचा?' हे त्याने या व्हिडीओतून सांगितले आहे. 

नक्की वाचा: पाणी कधी प्यावं? चहा पिण्याच्या आधी की नंतर? 99 % लोकांना माहितच नाही, वाचा डॉक्टर काय म्हणाले..

कुकरमध्ये चहा कसा बनवायचा? (How To Make Tea In Pressure Cooker)

यमनने या व्हिडीओमध्ये दावा केलाय की कुकरमध्ये बनवलेला चहा जास्त चांगला लागतो. त्याने म्हटलंय की कुकरमध्ये चहा बनविल्याने तो प्रेशरवर बनतो आणि त्याला 'दम' फ्लेवर येतो. कुकरमध्ये चहा बनिवण्यासाठी वेळही जास्त लागत नाही आणि चवही चांगली येते असा दावा यमनने केला आहे. दोन कप चहा बनविण्यासाठी यमनने अर्धा कप पाणी, दीड कप दूध घेतलं. त्यात आलं कुटून घालावं, किसून घालू नये असा सल्लाही त्याने दिला. तीन चमचे साखर आणि एक दीड चमचा चहा पावडर घालून त्याने कुकरचं झाकण बंद केलं. दोन शिट्ट्या येईपर्यंत त्याने वाट पाहिली आणि नंतर कुकरमध्ये चहा कसा बनलाय, हे त्याने दाखवलं. 

व्हिडीओवर उलट-सुलट प्रतिक्रिया

काहींनी ही आयडिया चांगली असल्याचं म्हटलंय तर काहींनी ही आयडिया बकवास असल्याचं म्हटलंय. मात्र कॉमेंट करणाऱ्यांपैकी अनेकांनी यमन अगरवाल याला एक प्रश्न विचारलाय की, चहा बनविल्यानंतर कुकर धुणार कोण? अन्य एकाने यमन अगरवाल याला खोचकपणे टोमणा मारत म्हटलंय की यापेक्षा चांगला चहा तर गीझरमध्ये बनेल. दुसऱ्या एकाने म्हटलंय की चहाला खिचडी आणि भाजीचा फ्लेव्हर येईल, चहा बनविण्यापूर्वी कुकर नीट धुवून घ्या. 

नक्की वाचा: चहा साखरेशिवाय प्यायल्यास मिळतील 5 मोठे फायदे, जाणून घ्या कसे?

कुकरमध्ये चहा कसा बनवायचा? पाहा यमन अगरवालचा व्हिडीओ
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com