
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागांमध्ये पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातही काही भागात पावसाचा जोर वाढलाय. विशेषत: मराठवाड्यातील लातूरमध्ये पावसामुळे जनजनीवन विस्कळीत झालं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेत. अशाच एका त्रस्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये शेतकरी पुरामुळे पीक नष्ट झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा हट्ट करतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लातूर जिल्ह्यातला आहे. लातूरमधील एक शेतकरी पुरामुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने आत्महत्येचा हट्ट करतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकरी पाण्याने भरलेल्या शेतात आक्रोश करताना दिसत आहे. तो म्हणत आहे, "सगळं वाहून गेलं, मला मरू द्या, जगून काय करू? घरी मुलं आहेत!"... शेतकऱ्यासोबत आणखी एक तरुण आहे, जो त्याला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय.
( नक्की वाचा : Latur Rain: लातूरमध्ये पावसाचे तांडव! 66 मार्ग वाहतुकीसाठी बंद; शेतीसह पशुधनाचे नुकसान, बळीराजा संकटात )
लातूरमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शेतात पाणी शिरल्याने आणि पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी गावातील एका वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यात तो आपल्या शेतात पाणी शिरताना पाहून रागाने ओरडत आहे. आणि आत्महत्येचा हट्ट करत आहे, गावकऱ्यांनी त्याला समजावून शांत केले.
'सब बह गया, मैं जी कर क्या करूं...'
— NDTV India (@ndtvindia) August 30, 2025
महाराष्ट्र के लातूर जिले से एक वीडियो सामने आया है जिसमें बाढ़ में फसल बर्बाद होने से एक किसान आत्महत्या करने की जिद करता नजर आ रहा है. वायरल वीडियो में किसान पानी भरे खेत में बिलख रहा है. वो कह रहा है, “सब बह गया, मुझे मर जाने दो, जी कर क्या… pic.twitter.com/ddPpxOnaLd
'सगळं काही उद्ध्वस्त झालं'
व्हिडिओमध्ये मराठीत तो वृद्ध शेतकरी म्हणतो, "माझी जमीन गेली, पीक उद्ध्वस्त झालं, काय करू? थोडंफार जे काही होतं, ते पण गेलं... मुलं आहेत... मला मरू द्या! मी जगणार नाही! मी जगणार नाही! कसं जगू? सगळं काही उद्ध्वस्त झालं, सगळं पीक पण गेलं! काय करू?"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world