जाहिरात

नवरीला हुंड्यात दिलेल्या बेडमधून निघाला प्रियकर, सासरची मंडळी झाली गार; नवरदेवाने केली अशी अवस्था, Video Viral

लग्नानंतर नवरीने अनेक वस्तू सासरी आणल्या. यामध्ये बेडपण होता. सासरची मंडळी बेड उघडून पाहत होती. तोपर्यंत सर्व ठीक सुरू होतं. मात्र...

नवरीला हुंड्यात दिलेल्या बेडमधून निघाला प्रियकर, सासरची मंडळी झाली गार; नवरदेवाने केली अशी अवस्था, Video Viral

Bride's ex-boyfriend kicked out of bed Viral Video : लग्न समारंभादरम्यान हुंड्याचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. अनेकदा या प्रथेमुळे नात्यांमधील दुरावा वाढतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ हुंड्यात आलेल्या बेडशी जोडलेला आहे. या बेडमध्ये नवरीचं गुपित लपलं आहे, जे समोर आल्यानंतर सर्वजणं हैरण झालं. NDTV मराठी या व्हिडिओची पुष्टी करीत नाही.

बेडच्या आत लपला नवरीचा प्रियकर...

लग्नानंतर नवरीने अनेक वस्तू सासरी आणल्या. यामध्ये बेडपण होता. सासरची मंडळी बेड उघडून पाहत होती. तोपर्यंत सर्व ठीक सुरू होतं. मात्र बेड संपूर्ण उघडल्यानंतर मंडळी हैराण झाली. बेडच्या आतमध्ये नवरीचा प्रियकर लपून बसला होता. हे पाहून सर्वांनाच जबर धक्का बसला. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरी या तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र कुटुंबाने जबरदस्ती दुसऱ्यासोबत हिचं लग्न लावुन दिलं. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जबरदस्तीने लावून दिलं लग्न...

हा व्हिडिओ ghar ke kalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोक विविध प्रकारच्या कमेंटमध्ये करीत आहे. आधीच प्रियकर असताना मुली लग्न का करतात, असा सवाल एकाने उपस्थित केला आहे. तर एका वापरकर्त्याने नवरदेवाला याबद्दल कसं कळालं असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तर एका तरुणीने प्रियकराच्या धाडसाचं कौतुकही केलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com