Manager Vs Employee Viral Chat: कोणत्याही व्यक्तीसाठी वडील होणे हा एक अत्यंत भावनिक क्षण असतो.हा क्षण आनंदासोबत जबाबदाऱ्या घेऊन येतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने ऑफिसच्या कामापलीकडे पत्नीला आणि बाळालाही वेळं देणं महत्त्वाचं असतं. पण काही ऑफिसमधील कामाची पद्धत काहीसी वेगळी असते. पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळीही मॅनेजर कर्मचाऱ्यांना काम करण्यास सांगतात.रेडिटवर एका युजरने बॉससोबत केलेली चॅटिंग शेअर करून घडलेला प्रकाराबाबत सांगितलं आहे. पत्नीची डिलिव्हरी (प्रसुती) होणार असल्याने तिची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे रुग्णालयातून काम करू शकत नाही.यावर त्याचा मॅनेजर त्या कर्मचाऱ्याला एचआरला मेल करून सुट्टी घेण्यास सांगतो.'तुझे आई-वडील आले का?', असाही प्रश्न तो मॅनेजर त्याला विचारतो.
"तुझे आई-वडील परिस्थिती सांभाळू शकतात.."
यावर तो कर्मचारी 'हो'असे उत्तर देतो. त्यानंतर मॅनेजर त्याला सांगतो की,तू पुढच्या आठवड्यात सुट्टी घे. तसच ऑफिसमधून काम करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्याला देतो."तुझे आई-वडील परिस्थिती सांभाळतील, असंही तो मॅनेजर त्याला सांगतो. यावर तो कर्मचारी म्हणतो, 'हो ते तसे करतील', बाकी गोष्टी मी परत आल्यावर करतो.यावर मॅनेजर म्हणतो,'तुला काहीही करायचं नाही'.
नक्की वाचा >> आधी केली सेक्सची डिमांड,नंतर केलं हस्तमैथुन..रिक्षात बसलेल्या परदेशी महिलेसोबत घडलं भयंकर
मॅनेजरने माणुसकी दाखवण्याऐवजी असं काही केलं..
रेडिटवर युजरने त्याच्या दुसऱ्या अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की, माझी पत्नी पहिल्या बाळाच्या प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होती. त्यासाठी मला दोन दिवसांची सुट्टी हवी आहे, असं मी मॅनेजरला सांगितलं होतं. पण मॅनेजरने माणुसकी दाखवण्याऐवजी बॉसने मला सुट्टी पुढे ढकलायला सांगितलं. 'तुझे आई-वडील हे सांभाळू शकतात का?', असंही मॅनेजरने मला विचारलं.
त्याने मला ‘वर्क फ्रॉम हॉस्पिटल' म्हणजेच हॉस्पिटलमधून काम करण्यास सांगितले. त्यानंतर मला धक्काच बसला.अशा परिस्थितीत जेव्हा मला माझ्या पत्नीवर आणि नवजात बाळावर लक्ष देण्याची गरज होती. कर्मचारी पुढे म्हणतो,‘सर्वात वाईट गोष्ट काय? मी नोकरी सोडू शकत नाही.मी एका मुलाचा बाप आहे आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत. माझ्या कंपनीत अशी परिस्थिती आहे की जर मी जास्त दबाव आणला तर मला खरंच नोकरीवरून काढून टाकले जाईल,अशी भीती आहे.