Woman Extra Marrital Affair Video : उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा बेडरूमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पतीनं पत्नीला रंगेहाथ पकडल्यानंतर तिचा प्रियकर बेडमध्ये लपला. हा धक्कादायक प्रकार सर्व कुटुंबीयांसमोरच उघडकीस आला. त्यानंतर पतीनं असा काही निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
विवाहित महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी घरी गेली होती. घरच्यांना संशय आला म्हणून त्यांनी सूनबाईच्या खोलीचे दार ठोठावले. त्यानंतर सूनबाईने प्रियकराला बेडमध्ये लपवून ठेवले. पण घरच्यांनी जेव्हा बेड उघडला, तेव्हा त्यातून महिलेचा प्रियकर बाहेर निघाला. बेडमधून महिलेचा प्रियकर बाहेर पडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील आहे. जिथे एका विवाहित महिलेनं प्रियकराने तिला भेटण्यासाठी तिच्या घरी प्रवेश केला होता. अलीम असं महिलेच्या प्रियकराचं नाव आहे. ही घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बभनगवा या गावात घडली आहे. महिलेच्या बेडमधून बॉयफ्रेंड बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांना या घटनेचा धक्का बसल्यानंतर त्यांनी त्या महिलेचे लग्न तिचा प्रियकर अलीमसोबत लावून दिलं.
नक्की वाचा >> स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर अपडेट केला नवा BIO, काय लिहिलंय? पलाशसोबतचे 'ते' फोटोही केले डिलीट
अयोध्या: विवाहित प्रेमिका से मिलने पहुंचा प्रेमी बेड में छिपा, पकड़े जाने पर पति और ससुर ने कराई शादी, वीडिया सोशल मीडिया पर वायरल#Ayodhya | #ViralVideo pic.twitter.com/KG1pcD4mQY
— NDTV India (@ndtvindia) December 7, 2025
महिलेचा पती दुबईत काम करतो
महिलेचा पती गल्फ देशात काम करतो. ती सासू-सासऱ्यांसोबत राहात होती. दरम्यान तिचे प्रियकराशी भेटणे सुरू होते. जेव्हा महिलेचा प्रियकर तिच्या बेडमधून बाहेर आला, तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर महिलेच्या पती आणि सासऱ्यांनी तिचे लग्न त्याच प्रियकराशी लावून दिले.
नक्की वाचा >> Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?
दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न लावलं
महिलेच्या सासऱ्यांनी म्हटलं की, माझा मुलगा दुबईत काम करतो. मुलगा आणि सूनबाईच्या वडिलांच्या संमतीनंतर तिचे लग्न आलिमसोबत लावण्यात आले. महिलेच्या पतीनेही व्हिडिओ कॉलद्वारे दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, अशी माहिती तेथील गावकऱ्यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world