जाहिरात

सून देत होती बाळाच्या आगमनाची पार्टी, सासू येऊन म्हणाली I am Pregnant! Viral Video

Viral Video : या व्हिडिओमध्ये सून काही सांगणार त्याचवेळी सासूनं शँपेननं भरलेला ग्लास उचलून 'मी गर्भवती आहे' अशी घोषणा केल्याचं दिसत आहे.

सून देत होती बाळाच्या आगमनाची पार्टी, सासू येऊन म्हणाली I am Pregnant! Viral Video
मुंबई:

आयुष्यमान खुराणा आणि नीना गुप्ता यांची मुख्य भूमिका असलेला 'बधाई हो' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये महिला उतारवयात गर्भवती झाालेल्या महिलांचा प्रश्न खुमासदार पद्धतीनं मांडला आहे.  पण, एकाच वेळी सून आणि सासू या दोघीही गर्भवती असतील तर.. नेमका हाच प्रकार घडला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हा व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. त्याचबरोबर NDTV मराठी याची पृष्टी देखील करत नाही. पण, @gohappiest या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

पश्चिमात्य देशात एका जोडप्यानं त्यांच्या होणाऱ्या बाळाची जेंडर रिवील पार्टी (Gender Reveal Party) ठेवली होती. अनेक पाश्चिमात्य देशात मुलांच्या जन्मापूर्वी बाळाचं लिंग काय आहे याची माहिती आई-वडिलांना दिली जाते. याबाबतची एक पार्टी या जोडप्यानं ठेवली होती. या पार्टीमध्ये महिलेच्या सासूनं येऊन केलेल्या घोषणेचा सर्वांनाच धक्का बसला.

( नक्की वाचा : हा आहे जगातील सर्वात भीतीदायक चित्रपट, फक्त 25 टॉकीजमध्ये झाला प्रदर्शित, अनेक देशांमध्ये होती बंदी )

या व्हिडिओमध्ये सून काही सांगणार त्याचवेळी सासूनं शँपेननं भरलेला ग्लास उचलून 'मी गर्भवती आहे' अशी घोषणा केल्याचं दिसत आहे. ही घोषणा करताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचबरोबर घरातील अन्य सदस्य निराश झाले.

पार्टीत उपस्थित लोकांनी सासूवर सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याचा आरोप केला. पण, तो आरोप महिलांनी फेटाळला. तसंच हे जोडपं देखील त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षण वाया गेल्यानं निराश दिसत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: