जाहिरात

VIDEO: प्रसिद्ध युट्यूबरच्या कूकची भयंकर विकृती! जेवण बनवताना घृणास्पद कृत्य; CCTVने केला भांडाफोड

लखनच्या आईनेही यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, "जर असे घडत असेल तर जेवणात किती घाण मिसळली असेल, याची कल्पना करणेही कठीण आहे," असे म्हटले आहे.

VIDEO: प्रसिद्ध युट्यूबरच्या कूकची भयंकर विकृती! जेवण बनवताना घृणास्पद कृत्य; CCTVने केला भांडाफोड

Neetu Bisht Viral Video:  सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडी प्रसिद्ध युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि नीतू बिष्ट सध्या एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या घरात काम करणाऱ्या स्वयंपाकी (कूक) कडून अत्यंत संतापजनक प्रकार घडल्याचा दावा या दांपत्याने केला आहे. जेवण बनवताना हा कूक किचनमधील सिंकमध्ये थुंकत असल्याचे समोर आले असून, ही सर्व घटना घराल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Virar Crime: डबल मर्डरने विरार हादरलं! लग्न ठरवायला गेला, दोघांना संपवून आला, भयंकर घटना

काय आहे नेमके प्रकरण?

नीतू बिष्टने तिच्या व्लॉगमध्ये या घटनेचा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती सातत्याने खालावली होती. वारंवार आजारी पडण्याचे कारण शोधण्यासाठी जेव्हा त्यांनी घरातील CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. व्हिडिओमध्ये त्यांचा कूक जेवण बनवत असताना वारंवार किचनमधील सिंकमध्ये थुंकताना दिसला.

नीतूच्या दाव्यानुसार, तो गुटखा खाऊन सिंकमध्ये थुंकत होता, ज्याचे शिंतोडे आजूबाजूला असलेल्या भांड्यांवर आणि जेवणावरही उडत होते.
​हा प्रकार गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असल्याचे समजताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. लखनच्या आईनेही यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, "जर असे घडत असेल तर जेवणात किती घाण मिसळली असेल, याची कल्पना करणेही कठीण आहे," असे म्हटले आहे.

नीतूच्या सासूनेही या कूकची खरडपट्टी केली. तू स्वयंपाक करताना थुंकायचास. तुझी किती थुंकी पोळ्या आणि भाज्यांमध्ये गेली असेल. तू लोकांना आजारी पाडत आहेस. माझी मुलं किती दिवसांपासून आजारी पडत आहेत. कोणीही बरं होत नाहीये. मला माहित नाही तो किती दिवसांपासून आम्हाला घाणेरडं अन्न खाऊ घालत आहे, असं त्या म्हणाल्या. 

(VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा) 

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

तसेच तो भांड्यांमध्ये थुंकतो. तुमच्या घरात लोक कुठे थुंकतात? तू भांड्यांमध्ये थुंकतोस का? हा माणूस ५ महिन्यांपासून आमची फसवणूक करत आहे. अशा माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या. तो खूप वाईट माणूस आहे. आम्ही आधी देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग स्वतः जेवतो. तो देवालाही खराब अन्न खाऊ घालत आहे, असं म्हणत संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी या घटनेला अत्यंत गंभीर आणि चिंताजनक म्हटले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com