period blood face mask trend : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. सध्या मासिक पाळीवेळी येणाऱ्या रक्ताबाबत वेगळाच दावा केला जात आहे. मासिक पाळीवेळी येणाऱ्या रक्तात स्टेम सेल, साइटोकाइन्स आणि प्रथिम असतं, जे त्वचेची कांती सुधारतं आणि ग्लो आणतं. ऐकायला हे एक प्रकारच्या बॉडी रिसायक्लिंग थेरेपीसारखं वाटतं, मात्र याला काही वैज्ञानिक आधार आहे की, सोशल मीडियावरच याची चर्चा सुरू आहे.
मॅन्स्ट्रुअल मास्किंग काय आहे? सध्या याचा ट्रेंड का वाढलाय?
काही देशांमधील टिकटॉकपासून या ट्रेंडची सुरुवात झाली. येथे #periodfacemask आणि #menstrualmasking सारख्या हॅशटॅगवर लाखो व्ह्यूज आहेत. लोक मॅन्स्ट्रुअप कपमधील रक्त चेहऱ्यावर काही मिनिटं लावून धुतात आणि यामुळे नैसर्गिकपणे ग्लो येत असल्याचा दावा करीत आहेत. काही लोक याला Spiritual ritual मून मास्किंग किंवा आपल्या शरीरासोत कनेक्शन वाढविण्याची पद्धत असल्याचं सांगत आहेत. मात्र त्वचेचे तज्ज्ञ या DIY ट्रेंडला धोकादायक म्हणत आहे.
मासिक पाळीच्या रक्तात काय असतं?
मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्त्राव हे केवळ रक्त नाही तर मिक्सअप आहे. यामध्ये असतं...
- ब्लड (RBC, WBC)
- गर्भाशयाच्या पडद्याचे तुकडे
- योनी आणि गर्भाशयातील द्रवपदार्थ
PRP (Platelet-Rich Plasma)सारख्या वैद्यकीय सेटअपमध्ये निर्जंतुकीकरण आणि प्रक्रिया केल्यानंतर केल्या जातात. मासिक पाळीचे रक्त पूर्णपणे वेगळं असतं. ते कच्चे, फिल्टर न केलेले आणि चाचणी न केलेलं असतं. आजपर्यंत, असा एकही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही की ज्याने मासिक पाळीचे रक्त चेहऱ्यावर लावल्याने काही फायदे होतो हे सिद्ध केलंय.
स्टेम्स सेल्सबाबतची चर्चा योग्य आहे का?
मासिक पाळीच्या रक्तात MenSCs असतात. मात्र हे स्टेम सेल्स थेट मासिक पाळीच्या रक्तातून नाही तर लॅबमध्ये वेगवेगळे, स्वच्छ केलेले आणि नियंत्रित परिस्थितीत वापर केला जातो. २०१९ आणि २०२१ मधील अनेक रिसर्चनुसार, यातून तयार केलेली एक्स्ट्रासेल्युलर वेसिकल्स संसर्ग कमी करण्यास मदत करते. मात्र हा सर्व अभ्यास लॅबमध्ये शुद्ध केलेल्या स्टेम सेल्सवर केला होता. मॅन्स्ट्रुअल कपमधील रक्तावर केलेला नाही.
नागरिकांनो सावध राहा...
CDC, WHO आणि UKHSA सारख्या जागतिक आरोग्य संस्थांनी नागरिकांना अलर्ट केलं आहे. मानवी रक्तामुळे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. त्यात HIV, Hepatitis B, Hepatitis C सारखे रक्तजन्य रोगजनक असू शकता. WHO च्या मते, रक्त आणि शरीरातील द्रव हाताळण्यासाठी वैद्यकीय दर्जाचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. युकेच्या त्वचाविज्ञान आणि शस्त्रक्रिया संघटनांनीही इशारा दिला आहे. मासिक पाळीचं रक्त थेट चेहऱ्यावर लावणं जोखीम ठरू शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world