
Mangaluru Man Kidnapping Viral CCTV Footage: भररस्त्यात गाडी अडवली, तरुण- तरुणीला जबरदस्तीने पकडलं अन् किडनॅप केले असे थरारक सीन आपण सिनेमात नेहमीच पाहतो. मात्र असाच फिल्मी कथेलाही फिका पाडेल असा खराखुरा अपहरणाचा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. (Real Life filmy-style kidnapping Video) ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लाईव्ह अपहरणाचा हा थरार पाहून नेटकरीही थक्क झालेत... कुठे अन् कसा घडला हा नेमका प्रकार? जाणून घ्या ( Karnataka Live Kidnapping Trending Video)
समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील मंगळूरु (Mangaluru) येथील कार स्ट्रीट (Car Street) परिसरात नुकतीच एक धक्कादायक आणि फिल्मी स्टाईल (Filmy Style) अपहरणाची (Kidnapping) घटना समोर आली आहे. सोन्याच्या व्यवहारातून एका व्यक्तीला भरदिवसा आणि भर रस्त्यातून गुंडांनी पळवून नेले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली असून, यामुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कसलं ते डेरिंग! महिलेने बिबट्याला दोरीने बांधलं, चादर टाकून घराबाहेर... खतरनाक VIDEO व्हायरल
नेमके काय घडले?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दुचाकीवर जात असताना, गुंडांच्या टोळीने प्रथम त्याचा रस्ता अडवला. काही क्षणातच, त्यांच्याजवळ एक कार येऊन थांबली. कोणताही विचार न करता हल्लेखोरांनी त्या व्यक्तीला (Forcefully) कारमध्ये ढकलले आणि तेथून वेगाने (Speeding) पळ काढला. एखाद्या क्राईम थ्रिलर (Crime Thriller) चित्रपटात घडावा, तसा हा सर्व प्रकार होता.
हे धाडसी अपहरण शहराच्या एका गजबजलेल्या भागात आणि दिवसाढवळ्या घडला आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक जागा किती असुरक्षित (Unsafe) झाल्या आहेत, हे स्पष्ट होते. शहरातील अशा महत्त्वाच्या (Prime) भागांमध्येही पोलिसांचा दृष्यमान बंदोबस्त (Visible Policing) नसणे, तसेच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती (Fear of Law) नसणे, हे गंभीर चिंतेचे कारण आहे.
A real-life, filmy-style kidnapping unfolded at Car Street, Mangaluru, for gold. The gang first intercepted the victim on a two-wheeler, blocking his path.Moments later, a car pulled up, and the assailants forcefully pushed the man inside before speeding away from the scene. The… pic.twitter.com/VXokT7lMRx
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) September 29, 2025
सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सोन्याच्या व्यवहारातून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हे अपहरण झाले, याचा तपास पोलीस करत आहेत. मंगळूरु शहरात अशा पद्धतीने खुलेआम गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world