Real Life 'Hum Dil De Chuke Sanam' in UP: एखाद्या चित्रपटात शोभावं असंच नाट्य उत्तर प्रदेशच्या एका गावात घडलं आहे. लग्नाच्या 9 वर्षानंतर जेव्हा एका पतीला आपल्या पत्नीच्या प्रेमप्रकरणाबद्दल सत्य समजलं, तेव्हा त्याने रागाच्या भरात टोकाचं पाऊल न उचलता असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या घटनेची सध्या या परिसरात सर्वत्र चर्चा सुरु आहे. लोक या पतीच्या संयमाचं आणि निर्णयाचं कौतुक करत आहेत.
काय आहे प्रकरण?
ही कहाणी सुरू होते 2016 मध्ये, जेव्हा आशिष तिवारी या तरुणाचं पिंकीसोबत लग्न झालं होतं. गेल्या 9 वर्षांपासून त्यांचा संसार सुरळीत सुरू होता आणि त्यांना 7 वर्षांचा अभिनव व 4 वर्षांचा अनुराग अशी दोन मुलेही आहेत.
मात्र, या सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची कुणकुण आशिषला लागली होती. त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला आणि शनिवारी त्याचा संशय खरे ठरले. आशिषने पिंकीला तिचा प्रियकर अमित शर्मासोबत पकडले.
(नक्की वाचा : धक्कादायक! बड्या आयपीएस अधिकाऱ्याचा ऑफिसमधील अश्लील VIDEO VIRAL; राजकारणात मोठी खळबळ )
पोलिसांपर्यंत पोहोचले प्रकरण
पत्नीला प्रियकरासोबत पकडल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी अमितला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं, तिथे दिवसभर या प्रकरणावर पंचायत बसली. दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये चर्चा झाली आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, पिंकीने सर्वांसमोर स्पष्ट केलं की तिला तिच्या पतीसोबत राहायचं नाही. ती प्रियकरासोबतच राहण्यावर ठाम होती आणि तिने आशिषसोबत परत जाण्यास नकार दिला.
मुलांनी आईला नाकारले आणि...
आई आणि पतीच्या या वादात दोन चिमुकल्या मुलांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. जेव्हा आईने आपल्या प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. अभिनव आणि अनुराग या दोघांनीही वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. आपल्या मुलांचा नकार आणि पत्नीचा हट्ट पाहून आशिषने मनाचा मोठेपणा दाखवत एक धाडसी निर्णय घेतला.
( नक्की वाचा : हातामध्ये सिगारेट, 120 पेक्षा जास्त स्पीडनं कार, 4 मित्राचा मृत्यू, पाहा 70 सेकंदांचा भयंकर VIDEO )
मंदिरात लावून दिलं लग्न
'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील क्लायमॅक्सप्रमाणे आशिषने रागावर नियंत्रण मिळवत आपल्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या हातात देण्याचं ठरवलं. सामाजिक संमतीने हा विवाह सोहळा पार पडला. अखेर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आसपुर देवसरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रमगढा गावात ही घटना घडली. अमरगड येथील एका प्राचीन शिव मंदिरात आशिषने स्वतः उभे राहून पत्नी पिंकीचे लग्न तिचा प्रियकर अमित शर्मा याच्याशी लावून दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world