YouTuber Seema Kanojiya Accident:
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण आणि फायदेशीर असतात. मात्र असे काही व्हिडीओ देखील असतात जे संतापजनक असतात. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक इन्फ्लुएन्सर अपघाताना व्हिडीओ बनवताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये यूट्यूबर सीमा कनोजिया रक्ताने माखलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत आणि नाका-तोंडातून रक्त येत आहे. अशी स्थिती असूनही सीमा रील बनवत आहे. मात्र सीमाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ सीमाला का बनवावा वाटला? तर काहीजण ती खोटं बोलत असल्याचं म्हणत आहेत.
यूट्यूबर सीमा कनोजियाचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात ती कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी रस्त्याच्या मधोमध खाली पडताना नाचताना दिसते. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीमा कनोजिया गंभीर जखमी दिसत आहे. अशी माहिती समोर येत आहेत तिचा अपघात झाला होता ज्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे. तिच्यासह तिचे काही मित्र या अपघातात जखमी झाले होते. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रुग्णालयात पोहोचलेला सीमाने उपचार घेण्याऐवजी व्हिडीओ बनवून चाहत्यांना क्षणोक्षणी अपडेट्स देताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीमाला रुग्णालयात नेले जात असतानाही ती रुग्णवाहिकेतच व्हिडिओ बनवत होती.
पहिल्या व्हिडीओमध्ये सीमा रस्त्याच्या कडेला एसयूव्हीच्या शेजारी बसलेली दिसत आहे. रस्ते अपघातानंतर काढलेला हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. अपघाताच्या वेळी ती कोणत्या वाहनातून जात होती हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
व्हिडिओमध्ये ती तिच्या एका मैत्रिणीला स्ट्रेचरमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखवत आहे. आपल्या मित्राच्या खांद्याकडे बोट दाखवत सीमा सांगते की तो गंभीर जखमी आहे. मलाही फ्रॅक्चर झाले आहे. मात्र, या व्हिडीओनंतर सीमावर नेटिझन्सनी सडकून टीका केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world