जाहिरात

Pune News : पुणे पोर्शे अपघात प्रकरण; सोशल मीडियावरील Viral Video तीन वर्ष जुना; अग्रवाल कुटुंबाचं स्पष्टीकरण

Pune Porsche Case: पुण्यातील बहुचर्चित आणि थरारक 'पोर्शे कार अपघात' प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pune News : पुणे पोर्शे अपघात प्रकरण; सोशल मीडियावरील Viral Video तीन वर्ष जुना; अग्रवाल कुटुंबाचं स्पष्टीकरण

अजिंक्य धायगुडे, पुणे

Pune Porsche Crash Case: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या हायप्रोफाइल पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीची महिन्याभरापूर्वीच कोर्टाने जामिनावर सुटका केली होती. दरम्यान अग्रवाल कुटुंबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आरोपींच्या तुरुंगातून झालेल्या सुटकेनंतर झाल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान या प्रकरणात अग्रवाल कुटुंबाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

'मुंबई से आया मेरा दोस्त...' गाण्यावर कुटुंबाचं सेलिब्रेशन...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी विशाल अग्रवाल हा आपल्या पत्नीसह गळ्यात नोटांचे मोठे हार घालून डान्स करताना दिसत आहे. "मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो..." या प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करत नाचताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने विशाल अग्रवाल याला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप आयटी इंजिनिअर्सचा जीव घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.

नक्की वाचा - Pune News : पुण्यात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; CNG च्या दरात पुन्हा वाढ, लवकरच शंभरी गाठणार?

अग्रवाल कुटुंबाकडून स्पष्टीकरण...

दरम्यान हा व्हिडिओ आरोपी तुरुंगातून सुटल्यानंतरचा असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा तीन वर्षे जुना असल्याचं स्पष्टीकरण वकील सोहनलाल जैन यांनी दिलं आहे. जैन हे आरोपीचे वकिल आहेत. या प्रकरणात अग्रवाल कुटुंबाच्या वकिलांनी प्रेस नोट प्रसिद्ध करीत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी प्रेस नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ २ सप्टेंबर २०२३ चा आहे. गोव्याला विशाल अग्रवाल याने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने जवळच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ गोव्यातील हॉटेलमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com