जाहिरात

Shocking DNA Test:पतीपत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड

Shocking DNA Test: सोशल मीडियावर एका जोडप्याच्या डीएनए टेस्टची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका डीएनए टेस्टमुळे या जोडप्याचे संपूर्ण आयुष्य बदललंय. काय आहे नेमकं प्रकरण?

Shocking DNA Test:पतीपत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड
"Shocking DNA Test: एका डीएनए टेस्टमुळे होत्याचे नव्हतं झालं"
Canva

DNA Test Reveal Big Secret: एका विवाहित जोडप्याने उत्सुकतेपोटी डीएनए चाचणी केली पण रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली. एका डीएनए टेस्टमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, याची माहिती महिलेने सोशल मीडियावर शेअर केलीय.  

डीएनए चाचणीमुळे कुटुंबाचं गुपित उघड (Shocking DNA Test)

सोशल मीडियावर पोस्ट करत महिलेने म्हटलंय की, "मला लहानपणापासूनच माहिती होते की मी डोनर कनसिव्ह्ड चाइल्ड आहे, माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्यापासून काहीही लपवून ठेवलेले नाही. मी फक्त हा विचार केला की डीएनए टेस्टमुळे आपल्या मूळ गोष्टींबाबत अधिक माहिती समजेल. पण रिपोर्ट पाहिल्यानंतर पूर्णपणे सुन्न झाले. तिचा डीएनए तिच्याच पतीशी जुळल्याची धक्कादायक माहिती अहवालाद्वारे समोर आली. सुरुवातीला ही प्रयोगशाळेची चूक असू शकते, असे तिला वाटले. पण पुन्हा चाचणी केल्यानंतर आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. तिचे सासरेच स्पर्म डोनर होते, ज्याद्वारे महिलेचा जन्म झाला होता. म्हणजे महिला आणि तिचा पती जैविकदृष्ट्या सावत्र भावंडे आहेत.

I just took a DNA test, turns out, I'm 23% related to my husband.
byu/Choice_Evidence1983 inBestofRedditorUpdates

'एका सत्यामुळे सर्व काही बदललं...' 

महिलेने पुढे असंही म्हटलंय की, माझ्या पतीवर माझं खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांच्या सोबतीने खूप चांगलं आयुष्य निर्माण केलंय आणि आम्हाला दोन मुलंही आहेत. पण या एका सत्याने सर्व काही बदललंय. असं वाटतंय की आमची संपूर्ण ओळख बदललीय. आम्ही दोघंही अनुवांशिक सल्लागाराचा (genetic counselor) सल्ला घेत आहेत आणि हे सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय.  

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल (DNA Test Viral Story)

Redditवर ही कहाणी व्हायरल झालीय. या पोस्टवर काही लोकांनी अविश्वसनीय आणि हृदयद्रावक अशी कमेंट केलीय. तर काही लोकांनी स्पर्म डोनेट करण्याचे नियम आणि पारदर्शकतेचे नियम अधिक कठोर नसावे का, असा प्रश्न उपस्थित केलाय.  

Gen-Z Jobs: Gen-Z पिढीला आवडतेय अशा पद्धतीची नोकरी, दोन IMP गोष्टींना प्राधान्य; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

(नक्की वाचा: Gen-Z Jobs: Gen-Z पिढीला आवडतेय अशा पद्धतीची नोकरी, दोन IMP गोष्टींना प्राधान्य; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा)

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स परिसरातील ही घटना आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. एका डीएनए टेस्टमुळे या जोडप्याच्या नात्याचा पायाच हललाय.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com