
नोएडामध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरुन चालतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान तरुणासोबत जे काही होतं ते संतापजनक आहे. तरुणाला मागून एक थार धडक देते. यानंतर तरुण शेजारील नाल्यात जाऊन पडतो. मिळालेल्या माहितीनुसार, थारची धडक होण्यापूर्वी तरुणाला मारहाण झाली होती आणि त्यानंतर तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. यासह आरोपींनी पकडण्यासाठी टीमचं गठण करण्यात आलं आहे. ही घटना पोलीस ठाणे सेक्टर 24 भागातील सेक्टर 53 ची असल्याचं सांगितलं जातं.
नोएडा के सेक्टर-53 में तेज रफ्तार थार ने लहूलुहान युवक को जोरदार टक्कर मार दी. घायल युवक उछल कर पास के नाले में जा गिरा. थार चालक मौके से फरार हो गया. पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है, आरोपियों की गिरफ्तारी के लिए टीम का गठन किया गया है. जानकारी के मुताबिक पहले दोनों के बीच मारपीट… pic.twitter.com/xszzDw9nKp
— NDTV India (@ndtvindia) June 3, 2025
पीडित तरुणाचं नाव सौरभ यादव असल्याचं सांगितलं जातं. तो नोएडातील सेक्टर 39 चा राहणारा आहे. थारमधून जाणाऱ्या चालकाचं पीडित तरुणासोबत भांडण झालं होतं. यानंतर दोघांमध्ये मारहाण झाली. जखमी सौरभ घटनास्थळावरुन जात असताना अचानक थार चालकाने तरुणाला मागून धडक दिली आणि चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून थार चालक आरोपीचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world