जाहिरात

VIDEO: वैष्णोदेवीच्या दारात चमत्कार! दर्शनाला गेलेली बहिण, 5 वर्षांपूर्वी हरवेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर

वैष्णोदेवीच्या दर्शनाला आली असतानाच तिला भिकाऱ्याच्या रुपात सापडला. बहिण भावाच्या मिलनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

VIDEO: वैष्णोदेवीच्या दारात चमत्कार! दर्शनाला गेलेली बहिण, 5 वर्षांपूर्वी हरवेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर

Sister Find Lost Brother Viral Video:  देवाला सर्व माहित असतं अन् तो योग्यवेळी सर्वकाही देतो असं म्हणतात. अशीच घटना वैष्णोदेवीच्या दरबारात घडली आहे. आपल्या हरवलेल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या बहिणीला 5 वर्षानंतर माता वैष्णोदेवीच्याच दरबारात पळ झालं. वैष्णोदेवीच्या दर्शनाला आली असतानाच तिला भिकाऱ्याच्या रुपात सापडला. बहिण भावाच्या मिलनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नेमकं काय घडलं?

 सुमारे पाच वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला. कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पोलिसांना बोलावले आणि  शोध घेतला, पण त्या निष्पाप मुलाचा कोणताही तपास लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि लोकांना वाटले की तो कदाचित कधीच परत येणार नाही. पण असे म्हणतात की बहिणीच्या प्रेमात आणि प्रार्थनेत देवालाही नतमस्तक करण्याची शक्ती असते. दररोज ती बहीण आपल्या आईकडे फक्त एकच विनंती करायची: "माझा भाऊ सुरक्षित राहो आणि मला त्याला एकदा तरी भेटता यावं."

जबरदस्त! अस्सा प्लान आखला... 80 लाखांचं कर्ज 12 महिन्यात फेडलं; तरुणीने सर्वांनाच केलं हैराण!

यावेळी ती बहीण माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जम्मू येथे गेली होती. प्रचंड गर्दी, जयघोषा अन् तीव्र उतारामधून ती मंदिराकडे जात होती, तेव्हा अचानक  अर्धकुंवारीजवळ तिला एक तरुण दिसला. तो फाटलेल्या कपड्यांमध्ये भिकाऱ्यासारखा एका बाजूला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर धूळ , खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिची नजर त्या चेहऱ्यावर पडताच, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हृदयातून जणू आवाज आला "हा तोच आहे!" जेव्हा ती जवळ गेली आणि तिने बारकाईने पाहिले, तेव्हा तिचा जीवच थरथरला तो तिचा धाकटा भाऊ होता, ज्याला तिने पाच वर्षांपूर्वी गमावले होते.

आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहीण रडू लागली. जेव्हा भावाने आपल्या बहिणीला पाहिले, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते इतके रडले की जवळ उभ्या असलेल्या भक्तांच्या डोळ्यातही पाणी आले. लोक थक्क झाले. लोक आता हा व्हिडिओ शेअर करत लिहित आहेत, "जर श्रद्धा खरी असेल, तर दगडसुद्धा बोलतात. इथे तर खुद्द आदिशक्तीने एक चमत्कार घडवला आहे."

Nashik News: महिन्याला 90 लाख कमाई! त्र्यंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनाचा घोटाळा; विश्वस्तच निघाला मास्टरमाईंड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com