जाहिरात
Story ProgressBack

टायटॅनिकचे 112 वर्षे जुने मेनू कार्ड व्हायरल, दुर्घटनेपूर्वी प्रवाशांनी या पदार्थांचा घेतला आस्वाद

Titanic Food Menu: 112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाज खोल समुद्रामध्ये बुडाले. या दुर्घटनेमध्ये मृत्यू होण्यापूर्वी प्रवाशांनी कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेतला होता? याची माहिती देणारे मेनू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Read Time: 3 min
टायटॅनिकचे 112 वर्षे जुने मेनू कार्ड व्हायरल, दुर्घटनेपूर्वी प्रवाशांनी या पदार्थांचा घेतला आस्वाद
दुर्घटनेच्या काही तास पूर्वी टायटॅनिकच्या प्रवाशांनी या पदार्थांचा घेतला होता आस्वाद

112 Year Old Titanic Menu: जगातील सर्वात प्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा 112 वर्षांपूर्वी मोठा अपघात झाला होता. वेगवेगळ्या कारणांमुळे हे जहाज चर्चेतच असतेच. पण दुर्घटनेच्या 112 वर्षांनंतर आता जहाजाच्या वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर एक फूड मेनू कार्ड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जहाजावर उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थाचे हे मेनू कार्ड (Menu Card) असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी असलेले मेनू कार्ड दिसत आहे, ज्यामध्ये चिकनपासून ते लापशीपर्यंत अशा अनेक पदार्थांचे पर्याय उपलब्ध होते.  

112 वर्षांपूर्वीचे मेनू कार्ड (Titanic Menu Card) 
112 वर्षापूर्वी टायटॅनिक जहाजाचा मोठा अपघात घडला होता, हे आपणास माहितीच असेल. अपघातामध्ये दीड हजारहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पण 21व्या शतकात देखील या जहाजाबाबतची माहिती जाणून घेण्याकरिता आजही अनेकजण उत्सुक आहेत. हीच बाब एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टद्वारे पुन्हा सिद्ध झाली आहे. 

(Alexaच्या मदतीने माकडांपासून वाचवला 15 महिन्यांच्या बहिणीचा जीव, मुलीने लढवली भन्नाट शक्कल)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X' वरील फेसिनेटिंग (Fascinating) नावाच्या पेजने टायटॅनिक जहाजावरील मेनू कार्ड शेअर केले आहे. ज्यामध्ये जहाजावरील फर्स्ट क्लास व थर्ड क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जारी करण्यात आलेले मेनू कार्डचे फोटो आपण पाहू शकता. मेनू कार्डवर 14 एप्रिल 1912 तारीख नमूद करण्यात आली आहे. मेनू कार्ड शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टायटॅनिक जहाज बुडण्याच्या एक दिवसापूर्वी, म्हणजेच 14 एप्रिल 1912 या दिवसाचे टायटॅनिकचे फर्स्ट क्लास Vs थर्ड क्लासचे मेनू कार्ड”

('मै नागिन तू सपेरा'...नागीण डान्स करणाऱ्या महिलेला पाहून 2 जणांनी असं काही केलं... Video)

व्हायरल पोस्ट

दुर्घटनेपूर्वी प्रवाशांनी कोणत्या पदार्थांचा घेतला होता आस्वाद? (Food On Titanic Ship)
टायटॅनिक जहाजावरील फूड मेनू कार्डचा ब्रिटनमध्ये 84 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीत लिलाव झाला. फूड मेनूची ही शेवटची कॉपी होती, असेही म्हटले जाते आहे. दरम्यान दुघर्टनेपूर्वी जहाजावरील प्रवाशांनी कोणकोणत्या पदार्थाचा आस्वाद घेतला होता, हे या व्हायरल कार्डद्वारे समजू शकते. व्हायरल पोस्टनुसार फर्स्ट क्लासमधील प्रवाशांसाठी मेनूमध्ये चिकन, भजी आणि भाज्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ग्रील्ड मटण, सॉसेज पनीर, चीज, फळ व हिरव्या भाज्या अशा अनेक पदार्थांचाही पर्याय उपलब्ध होता.  

तुफान व्हायरल होत आहे पोस्ट (Menu Of Titanic Is Viral)
तर थर्ड क्लासमधील प्रवाशांकरिता लापशी, दूध, बटाटे, अंडे, ब्रेड, लोणी, चहा आणि कॉफी यासारख्या खाद्यपदार्थांचा पर्याय उपलब्ध होता. दरम्यान सोशल मीडियावर आतापर्यंत 1.2 मिलियन लोकांनी ही पोस्ट पाहिली तर 8 हजारहून अधिक लोकांनी पोस्ट लाइक केली आहे. 

(Video: माय-लेकींच्या धाडसाला सलाम! घरात घुसलेल्या दरोडेखोरालाच भिडल्या CCTV मध्ये कैद झाला थरार)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination