जाहिरात

Trending News: लग्नाची लगबग.. नवरदेव सासरच्या मंडळींना इम्प्रेस करायला गेला; तडफडून जीव गमावला

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नोंदीनुसार, मृत्यूचे अधिकृत कारण 'श्वसनक्रिया बंद पडणे' असे नोंदवले गेले आहे.

Trending News: लग्नाची लगबग.. नवरदेव सासरच्या मंडळींना इम्प्रेस करायला गेला; तडफडून जीव गमावला

Chinese Man Weight Loss Surgery: लग्नाच्या आधी नवरीच्या कुटुंबियांना इंप्रेस करण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. या तरुणाने वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. मात्र या शस्त्रक्रियेनंतर त्याची तब्येत बिघडली ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चीनच्या हेनान प्रांतात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय ली झियांग (काल्पनिक नाव) नावाच्या तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोच्या कुटुंबावर चांगली छाप पाडण्यासाठी आणि निरोगी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया केली, मात्र याच शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे.

Emotional Video : रात्री झोपला अन् उठलाच नाही..., रिक्षाचालकाने 27 वर्षांचा मुलगा गमावला; भावुक करणारी कहाणी

​ली झियांगचे वजन १३४ किलोग्रॅमपेक्षा जास्त होते, तसेच तो लठ्ठपणा आणि खाण्याच्या विकारांमुळे  त्रस्त होता. मात्र जेव्हा त्याच्या लग्नाची बोलणी सुरु झाली तेव्हा त्याने मुलीच्या कुटुंबासमोर फीट आणि निरोगी दिसावे म्हणून लवकरात लवकर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात अपयश आल्यामुळे लीने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. यासाठी त्याने ३० सप्टेंबर रोजी झेंगझोऊ येथील नवव्या पीपल्स हॉस्पिटलमध्ये भरती झाला.

त्याच्यावर ​२ ऑक्टोबर रोजी त्यांची गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. प्राथमिक देखभालीसाठी त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आणि ३ ऑक्टोबर रोजी त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, ४ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती अचानक  खालावली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा श्वास थांबला आणि त्यांना त्वरित पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नोंदीनुसार, मृत्यूचे अधिकृत कारण 'श्वसनक्रिया बंद पडणे' असे नोंदवले गेले आहे.

​वैद्यकीय नोंदीनुसार, ली यांना अनेक गंभीर पूर्व-अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या होत्या. यामध्ये सातत्याने वजन वाढणे, मोठ्याने घोरणे, चयापचय सिंड्रोम (Metabolic Syndrome), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि फॅटी लिव्हर (Fatty Liver) यांसारख्या समस्यांचा समावेश होता. या सर्व आजारांमुळेच ते वजन कमी करण्यासाठी संघर्ष करत होते.

नक्की वाचा - Viral Video : मोठेपणी काय होणार? विद्यार्थ्याचं उत्तर ऐकताच वर्गशिक्षिकेने काढला पळ, पाहा Video

ली यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी शस्त्रक्रियेपूर्वी योग्य आणि सखोल तपासणी झाली होती का, तसेच शस्त्रक्रियेनंतर वेळेवर आणि पुरेशी काळजी व देखरेख पुरवली गेली का, असे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.​यावर रुग्णालयाने आपली बाजू मांडली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com