जाहिरात

Viral News: तुमच्या बॅगमध्ये हत्ती आहे... विमानतळावर तपासणीवेळी प्रवाशाची बॅगची उघडली आणि सर्व सत्य आलं समोर

Viral News: विमानतळावरील स्कॅनर मशीन तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगमध्ये हत्ती आढळला. पुढे काय झालं वाचा...

Viral News: तुमच्या बॅगमध्ये हत्ती आहे... विमानतळावर तपासणीवेळी प्रवाशाची बॅगची उघडली आणि सर्व सत्य आलं समोर
"Viral News: प्रवाशाच्या बॅगमध्ये हत्ती आढळला?
Canva

Viral News: सध्या सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय उद्योजक परमिंदर सिंग यांना विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एक वेगळाच अनुभव आला. एअरपोर्ट स्टाफने त्यांच्या बॅगमध्ये हत्ती असल्याचे सांगितल्यानंतर ते चक्रावले. 

स्कॅनरमध्ये दिसला 'हत्ती'?

परमिंदर सिंग यांनी हा संपूर्ण अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्टद्वारे शेअर केला आहे. परमिंदर सिंग यांनी म्हटलं की, जेव्हा बॅग स्कॅनर मशीनमधून जात होती, तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी मधेच थांबवली. आपण सर्व नियमांचे पालन केले असताना नेमकी अडचण काय आहे, हे त्यांना समजेना. तेव्हा एका अधिकाऱ्याने स्क्रीनकडे बोट दाखवत म्हटले, "सर, तुमच्या स्कॅनिंगमध्ये हत्ती आला आहे." हे ऐकून तिथे उपस्थित सर्वजण चकित झाले, कारण स्कॅनिंग मशिनमध्ये खरोखरच हत्तीसारखी आकृती स्पष्ट दिसत होती.

(नक्की वाचा: Dhurandhar Vs Dhanandhar Video: रणवीर सिंगचा धुरंधर की अशोक सराफांचा धनंधर? सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ)

बॅग उघडली आणि सत्य समोर 

जेव्हा परमिंदर सिंग यांनी आपली बॅग उघडली, तेव्हा सर्व गोंधळ मिटला. खरं तर त्यांच्या बॅगेत हत्तीची एक छोटी शोभेची वस्तू होती, जी त्यांनी हॉटेल ताज आमेरमधून खरेदी केली होती. सत्य समोर येताच सुरक्षा कर्मचारी आणि स्वतः सिंग यांनाही हसू अनावर झाले.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हटले की, "कदाचित अधिकाऱ्यांना वाटले असावे की खरंच काहीतरी मोठे प्रकरण आहे." दुसऱ्याने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, एकदा खेळण्यातील डायनासोरमुळे त्यालाही असेच रोखण्यात आले होते. तर एकाने सिंगापूर विमानतळावर क्रिस्टल कासवामुळे आपली चौकशी झाल्याचे सांगितले.

असे का घडते?

विमानतळावरील स्कॅनर मशिन्स वस्तूंचा आकार आणि त्यांची घनता (density) यानुसार प्रतिमा दाखवतात. अनेकदा साध्या वस्तूही विचित्र किंवा संशयास्पद आकाराच्या दिसू शकतात, ज्यामुळे सुरक्षा कारणास्तव त्यांची अधिक तपासणी केली जाते.
 
(Disclaimer: ही बातमी सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याच्या पोस्टवर आधारित आहे. एनडीटीव्ही या मजकुराच्या प्रामाणिकतेची पुष्टी करत नाही.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com