Viral News: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर नेटकरी कायमच परखड मत मांडतात. एका छोट्या गावातील चित्रविचित्र नियमांवरही सध्या सोशल मीडियावर वादविवाद सुरू असल्याचे दिसतंय. लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप आणि अगदी वाद घालणे याविरोधातही दंडाची घोषणा करणाऱ्या गावातील नोटीस पाहून लोकांना धक्का बसलाय.
नेमकं कुठलंय हे प्रकरण?
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीन देशातील युनान प्रांतातील लिनहँग गावातील हा प्रकार आहे. गावामध्ये लावण्यात आलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झालीय. "गावाचे नियम : सर्व समान आहेत" असे नोटीसचे शीर्षक आहे. या नियमांमध्ये लग्न आणि खासगी जीवनाशी संबंधित कित्येक कठोर स्वरपातील दंडात्मक कारवाईचा उल्लेख करण्यात आलाय, यावरूनच वादविवाद सुरू आहे.
लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपवरही दंड
नोटीसनुसार जर एखाद्या व्यक्तीने युनान प्रांताबाहेर लग्न केलं तर संबंधित व्यक्तीला 1,500 युआन दंड (भारतीय चलनानुसार जवळपास 19,175 रुपये), जर एखादी महिला लग्नापूर्वीच गर्भवती राहिली तर 3,000 युआन दंड (भारतीय चलनानुसार जवळपास 38,350 रुपये) आकारला जाईल. तसंच लग्नाशिवायच एकत्र राहणाऱ्या जोडप्याकडून प्रत्येक वर्षी 500 युआन (भारतीय चलनानुसार जवळपास 6,391 रुपये) वसूल केली जातील.
मुलाचा जन्म आणि भांडणावरही शिक्षा
जर लग्न झाल्यानंतर केवळ 10 महिन्यांच्या आतच बाळाला जन्म देत असाल तर पालकांकडून 3,000 युआन दंड (भारतीय चलनानुसार जवळपास 38,350 रुपये) आकारला जाईल. इतकंच नव्हे तर कोणत्याही जोडप्यातील वाद सोडवण्यासाठी गावातील अधिकाऱ्यांना बोलावलं जात असेल तर दोन्ही पक्षाकडून प्रत्येक 500 युआन (भारतीय चलनानुसार जवळपास 6,391 रुपये) आकारले जातील, असंही नोटीसमध्ये म्हटलं गेलंय.
दारू, गोंधळ आणि अफवांवर बंदी
गावामध्ये नशा करून गोंधळ घातल्यास किंवा समस्या निर्माण केल्यास 3,000 युआनपासून ते 5,000 युआनपर्यंत दंड (भारतीय चलनानुसार जवळपास 38,350 रुपयांपासून ते 63,917 रुपयांपर्यंत दंड) आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासह अफवा पसरवणं, पुराव्यांविना आरोप करणाऱ्या व्यक्तीकडून 500 युआनपासून ते 1,000 युआनपर्यंत दंड (भारतीय चलनानुसार जवळपास 6,391 रुपयांपासून ते 12,783 रुपयांपर्यंत दंड) वसूल करण्यात येईल.
(नक्की वाचा: Viral News: स्वर्गही पाहिला, नरकातील भयंकर किंकाळ्याही ऐकल्या...11 मिनिटांसाठी मेली आणि पाहून आली दुसरं जग)
सरकारने काय म्हटलं?16 डिसेंबर रोजी मेंगडिंग टाउन प्रशासनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही नोटीस अतिशय सामान्य होती आणि आता ती हटवण्यात आलीय. संबंधित नोटीस गावाच्या समितीने त्यांच्या मर्जीने लावली होती तसेच याकरिता स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
(नक्की वाचा: Viral News: निष्ठावंत कर्मचाऱ्यांचा सन्मान, या कंपनीच्या मालकानं 2100 कोटी रुपयांचा बोनस दिला, कौतुकास्पद पाऊल)
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला रागचीनमधील गावाच्या या नियमांची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. काही युजर्संनी यास वैयक्तिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप असल्याचं तर काहींनी मागासलेपणाचे उदाहरण असल्याचं म्हटलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

