Viral News: तंत्रज्ञानाच्या युगात दरवर्षी असे काही प्रॉडक्ट्स समोर येतात जे लोकांना आश्चर्यचकित करतात आणि विचार करायलाही भाग पाडतात. CES 2026मध्ये यंदा असंच एक अनोखं प्रॉडक्ट लाँच करण्यात आलंय. एक असे लॉलीपॉप जे खाताच मेंदूमध्ये थेट गाणं वाजते. पण या लॉलीपॉपच्या किंमतीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
लॉलीपॉप खाताच डोक्यात वाजतंय गाणं
या अनोख्या कँडीचं नाव Lollipop Star असे आहे. हे लॉलीपॉप चावताच किंवा चाखताच खाणाऱ्याला गाणं ऐकू येतं, पण आश्चर्यकारक बाब म्हणजे आजूबाजूच्या लोकांना काहीच ऐकू येत नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात बोन कंडक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. हे तंत्रज्ञान आवाज डोक्याच्या हाडांमधून थेट कानांपर्यंत पोहोचवते. कंपनीच्या प्रवक्त्या केसी लॉरेन्स यांनी सांगितलं की, लॉलीपॉपमधून निर्माण होणारे व्हायब्रेशन्स डोक्याच्या हाडांद्वारे संगीत पोहोचवण्याचं काम करतात.
लॉलीपॉपमध्ये Ice Spice आणि Akonची गाणी
कंपनीनं दावा केलाय की, या लॉलीपॉपमध्ये Ice Spice, Akon आणि Armani White यासारख्या कलाकारांची गाणी ऐकायला मिळतील. सध्या हे लॉलीपॉप लिमिटेड एडिशन प्री-लाँचमध्ये आहे आणि इच्छुक लोक वेबसाइटवरील वेटिंगलिस्ट जॉइन करू शकतात.
(नक्की वाचा: Viral Video: Blinkitहून रात्री उशीरा महिलेनं असं काही ऑर्डर केले, Delivery Boyला आला संशय, मग जे घडलं ते...)
800 रुपयांचं एक लॉलीपॉप, कधी आणि कुठे मिळणार?Lava कंपनीने तयार केलेले हे म्युझिकल लॉलीपॉप CES 2026 नंतर Lollipop Starच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या लॉलीपॉपची किंमत $8.99 म्हणजे जवळपास 808 रुपये इतकी आहे. याच किमतीमुळे सोशल मीडियावर लोक आश्चर्य व्यक्त करतायेत तर काही जण नाराजीही व्यक्त करत आहेत.
हे तर आधीही पाहिलंय...हे लॉलीपॉप लाँच केल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स फारसे प्रभावित झाल्याचे दिसत नाही. अनेकांनी म्हटलं की, हे तंत्रज्ञान यापूर्वीही मुलांच्या टूथब्रशमध्ये वापरण्यात आलं होतं. एका युजरने लिहिलं,"मला कँडी खाताना जाहिराती ऐकायच्या नाहीत". दुसऱ्याने म्हटलंय,"माझ्याकडे लहानपणी असा टूथब्रश होता, ज्यात हॅना मॉन्टानाचं गाणं ऐकू यायचं".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
