China's Biggest Jewellery Trading Hub: जेथे दररोज सोने-चांदीचे दागिने पाहणं सामान्य बाब आहे, तेथे 15 किलो वजनाची चांदीच्या धातूची स्लॅब दिसल्यास ग्राहकांची गर्दी होणारच. चीन देशातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे मोठे हब मानल्या जाणाऱ्या शुइबेई परिसरातील व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय. शेन्जेन शहरातील लुओहु जिल्ह्यातील शुइबेई क्षेत्र चीनमधील सर्वात मोठे सोने आणि दागिन्यांचे हब मानले जाते. येथे दररोज टनच्या-टन प्रमाणात सोने आणि चांदी धातूची-दागिन्यांची खरेदी-विक्री होते. अलीकडे येथे विक्रीसाठी ठेवलेली 15 किलो वजनाची SGE चांदीच्या स्लॅबवर सर्वांची नजर खिळलीय. पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये 15 kg SGE सिल्व्हर स्लॅबची विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान ही कोणतीही सामान्य स्वरुपातील चांदी नाहीय तर Shanghai Gold Exchange (SGE) स्टँडर्ड चांदी आहे म्हणजे शुद्ध आणि आंतरराष्ट्रीय ट्रेडचे मानक असलेला धातू आहे.

चीनचे सर्वात मोठे गोल्ड-सिल्वर ट्रेड हब (China's Largest Gold and Silver Market)
शुइबेई परिसर हा लुओहु जिल्ह्यात आहे आणि ते चीन देशातील सर्वात मोठे सोने आणि दागिन्यांचे ट्रेडिंग हब मानले जाते. देशभरातील ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स, होलसेल ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार येथे येऊन सोने आणि चांदी खरेदी करतात. येथे रोज मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे व्यवहार होतात, या प्रक्रियेत जड वजनाच्या स्लॅब्स दिसणे असामान्य नव्हे पण सामान्य लोकांसाठी हे दृश्य आश्चर्यचकित करणारे नक्कीच असते. जड स्वरुपातील चांदीच्या स्लॅबचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. SGE सिल्व्हर म्हणजे थेट गुंतवणूक, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग आणि मोठ्या ट्रेडर्ससाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
(नक्की वाचा: 1 जानेवारीपासून 10 मोठे नियम बदलणार! 8व्या वेतन आयोगापासून ते PAN-Aadhaar पर्यंत, तुमच्या खिशावर होईल परिणाम)

SGE सिल्व्हर स्लॅब म्हणजे काय? (What is SGE Silver Slab?)
SGE म्हणजे Shanghai Gold Exchange, चीन देशातील अधिकृत आणि नियमन केलेली कमोडिटी एक्सचेंज. SGE सिल्व्हर स्लॅब ही प्रमाणित शुद्धतेची (साधारणपणे 99.9%) चांदी आहे, जी गुंतवणूक, दागिने तयार करण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी मान्यता प्राप्त आहे. 15 किलो वजनाची सिल्व्हर स्लॅबची सहसा रिटेल स्वरुपातील ग्राहकांकडे नव्हे तर मोठ्या ट्रेडर्स आणि कंपन्यांकडे विक्री केली जाते.
NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही
15 किलो वजनाची स्लॅब का महत्त्वाची आहे?(Why a 15 Kg Silver Slab Matters)चाँदी ले लो! चाँदी ले लो!
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) December 31, 2025
चीन के सबसे बड़े गोल्ड और ज्वेलरी हब, शुइबेई (水贝) शेन्ज़ेन लुओहु डिस्ट्रिक्ट में बिक रहे 15 kg SGE ‘सिल्वर स्लैब' की एक झलक।
pic.twitter.com/8c3YcBXJRA
एकीकडे जगभरात डिजिटल गुंतवणुकीवर भर दिला जात असताना शुइबेई शहरासारखे मार्केट हे दर्शवतंय की खऱ्या धातूला आजही मोठी मागणी आहे. ही माहिती त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे जे सोने-चांदीला फक्त ज्वेलरी म्हणून नाही तर आवश्यक गुंतवणूक म्हणून पाहतात.

(नक्की वाचा: SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन)
चीनमधील दागिन्यांचे मार्केट (China gold silver hub)चीनचे हे मार्केट केवळ एशियापुरते मर्यादित नाही तर जागतिक पुरवठा साखळीला दिशा देते. शुइबेई शहरामध्ये विकली जाणारी 15 किलो वजनाची चांदीची स्लॅब फक्त चमकदार नाहीय तर वजनदारही आहे. ही फक्त चीनचीच नव्हे तर बदलत्या जागतिक गुंतवणुकीचा विश्वासाची कहाणी दर्शवते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world