Viral VIdeo: सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या विमानांमधून टिपलेले सुंदर व्हिडिओ व्हायरल होत असतात. एका भारतीय वैमानिकाने असाच एक शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. इंडिगो एअरलाईन्सचे कॅप्टन प्रदीप कृष्णन यांनी रात्रीच्या प्रवासादरम्यान विमानाच्या कॉकपिटमधून भारत-पाकिस्तान सीमेचे एक अत्यंत विहंगम आणि विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. रात्रीच्या गडद अंधारामध्ये प्रकाशमान झालेली एक सरळ रेषा दोन्ही देशांच्या सीमांची कशी विभागणी करते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
"जगातील सर्वात संवेदनशील सीमा..."
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये कॅप्टन कृष्णन केवळ व्हिडिओच बनवत नाहीत, तर विमानावरील प्रवाशांना अनाऊन्समेंटद्वारे या दृश्याची माहिती देतानाही ऐकू येत आहेत. ते प्रवाशांना म्हणतात, "जर तुम्ही विमानाबाहेर पाहिले तर तुम्हाला जगातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षा असलेल्या सीमांपैकी एका सीमेचे दर्शन घडेल, ती म्हणजे भारत आणि पाकिस्तानची सीमा."
(नक्की वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल)
विमानाच्या क्रूझिंग उंचीवरून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये रात्रीच्या गडद अंधारात फ्लडलाईट्सची एक सलग पिवळी रेषा जमिनीवरून धावताना दिसते. ही प्रकाशमान रेषा म्हणजेच दोन्ही देशांना वेगळी करणारी ऐतिहासिक'रॅडक्लिफ लाईन' आहे. सीमेवरील चौक्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या ठिकाणी असलेल्या दिव्यांच्या प्रकाशामुळे आकाशातून हे दृश्य अत्यंत अद्भूत आणि अंगावर काटा आणणारे भासते.
अंतराळातूनही दिसते ही प्रकाशरेषा
हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर करण्यात आला होता की, "असे म्हणतात की रात्रीच्या वेळी तुम्ही अंतराळातूनही भारत-पाकिस्तान सीमा पाहू शकता, अंधाराला छेदणारी प्रकाशाची एक चमकती रेषा अगदी कक्षेतूनही स्पष्ट दिसते."
(नक्की वाचा- Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला असून त्यावर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी सांगितले की त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेला यापूर्वी कधीही अशा अनोक्या दृष्टिकोनातून पाहिले नव्हते. तर काहींनी या निमित्ताने दोन्ही देशांमधील राजकीय आणि ऐतिहासिक संबंधांवर भाष्य केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world