जाहिरात

Video Viral: डोक्यावर कढई आणि चेहऱ्यावर भलताच कॉन्फिडन्स, हेल्मेट नसल्याने दंड टाळण्यासाठी तरुणाचा जुगाड

Video Viral: वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी एका व्यक्तीने डोक्यावर चक्क कढई ठेवली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video Viral: डोक्यावर कढई आणि चेहऱ्यावर भलताच कॉन्फिडन्स, हेल्मेट नसल्याने दंड टाळण्यासाठी तरुणाचा जुगाड
Man spotted Wearing Frying Pan Instead Of Helmet : दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तरुणाचा भलताच जुगाड
Social Media

Man Wears Kadhai As Helmet On Bike Viral Video: कधी-कधी वाहतूक कोंडीमध्ये अशा एक-एक भन्नाट गोष्टी पाहायला मिळतात की पोट धरून हसू येते तर काही वेळेस कपाळावर हात मारण्याची इच्छा होते. बंगळुरू शहरातील (Bengaluru Viral Video) असाच काहीसा गंमतीशीर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. बाइकस्वाराच्या पाठीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी डोक्यावर कढई (Frying Pan Helmet) ठेवली. कारण त्याच्या हेल्मेट नव्हते. हा अनोखा जुगाड पाहून लोक आश्चर्यचकितही झाले आणि हसून हसून काहींनी पोट धरलं. सोशल मीडियावर 'Peak Bengaluru Moment' या नावाने व्हिडीओ ट्रेंड होतोय.  

डोक्यावर कढई आणि चेहऱ्यावर भलताच कॉन्फिडन्स (Bengluru Shocking Viral Video)

बाइकस्वार त्याच्या मित्रासोबत वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. पण बाइकस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर  हेल्मेट नव्हते. वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी त्याने चक्क डोक्यावर कढई ठेवली. हा व्हिडीओ रूरेना अग्राहारा (Rupena Agrahara) परिसरातील असल्याचे म्हटलं जातंय. @karnatakaportf नावाच्या 'X' हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. कमेंट बॉक्समध्ये लोकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. एका युजरने म्हटलं की, "पत्नी किचनमध्ये भांडे शोधत असेल आणि हा माणूस ते डोक्यावर घेऊन फिरतोय".

 जुगाड ठरू शकतो जीवघेणा

  • गंमतीशीर भाग ठीकेय पण डोक्यावर कढई (Frying Pan Helmet Side Effects) ठेवणे जीवघेणे ठरू शकते.
  • व्हिडीओ गंमतीशीर असला तरी ट्रॅफिक पोलिसांनी हा ट्रेंड धोकादायक असल्याचे म्हटलंय. 
  • हेल्मेट हे कोणतेही फॅशनचे साधन नाहीय तर अपघातामध्ये जीव वाचवण्यासाठीचे सुरक्षाकवच आहे.  
  • फ्राइंग पॅनमुळे दुर्घटनेमध्ये डोके सुरक्षित राहू शकत नाही. 
  • तज्ज्ञांच्या मते, अशा पद्धतीचा जुगाड जीवघेणा ठरू शकतो शिवाय दंडही भरावा लागू शकतो. 
  • जुगाड करुन नव्हे तर योग्य गोष्टी वापरुन डोकं वाचवा. 

Viral Video: जेवण करता-करता 18 वर्षांची मेहुणी बहिणीच्या 55 वर्षांच्या पतीच्या प्रेमात पडली,  Love Storyचे काय आहे सत्य?

(नक्की वाचा:Viral Video: जेवण करता-करता 18 वर्षांची मेहुणी बहिणीच्या 55 वर्षांच्या पतीच्या प्रेमात पडली, Love Storyचे काय आहे सत्य?)

(Disclaimer: NDTV Marathi या व्हिडीओची पुष्टी करत नाही.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com