Total Solar Eclipse : 'आदित्य एल-1' ला का दिसणार नाही सूर्यग्रहण? वाचा कारण...

जाहिरात
Read Time: 2 mins
'आदित्य एल-1' ला का दिसणार नाही सूर्यग्रहण? वाचा कारण...
मुंबई:

आज जगभरात अनेक ठिकाणी सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतील तेव्हा सूर्यग्रहण लागेल. सुमारे 4 मिनिटे अंधार होईल. हे दृश्य संपूर्ण अमेरिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे दृश्य पाहण्यासाठी स्कायडायव्हिंगपासून ते विशेष विमानांपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा 'आदित्य एल-1 'ला आजचा सूर्यग्रहण पाहता येणार नाही.

अमेरिकेत दिसणार सूर्यग्रहण...

  • पहिल्यांदाच सूर्यग्रहण अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या पश्चिम आणि उत्तर भागात दिसणार आहे. 
  • "8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेतसह मेक्सिको आणि कॅनडामध्ये ही पाहता येईल. असं नासा'ने स्पष्ट केले आहे.
  • चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा सूर्यग्रहण लागतो. 

'आदित्य एल-1' ला का दिसणार नाही सूर्यग्रहण? 

  • सूर्यग्रहणाची संपूर्ण घटना अनेक तास चालेल, ज्या दरम्यान दिवस रात्रीसारखा वाटेल. 
  • आकाशात 4 मिनिटे पूर्ण अंधार होईल.
  • आदित्य एल 1 उपग्रह या ग्रहणाचा साक्षीदार होऊ शकणार नाही. 
  • आदित्य एल 1 उपग्रह 24x7, 365 दिवस सूर्य पाहू शकतो अशा ठिकाणी ठेवण्यात आला आहे. 
  • आदित्य L1 उपग्रह अंतराळ यानाच्या मागे लॅग्रेंज पॉईंट 1 (L1 पॉइंट) वर आहे. 
  • हे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर आहे.
  • ग्रहणामुळे उपग्रहाच्या दृश्यात कधीही व्यत्यय येऊ नये यासाठी अशी जागा निवडण्यात आली आहे.

'आदित्य एल 1' मोहिमेचे प्रमुख हेतू

  • सूर्याच्या प्रभामंडळाचे तापमान तसेच सौर वाऱ्यांच्या गतीची नोंद घेणे. 
  • सौर वाऱ्यांच्या घडामोडी, सौरज्वाला आणि पृथ्वीजवळील वातावरणावर होणारा परिणाम समजून घेणे. 
  • सूर्याच्या वातावरणाची गतीशीलता, सौर वाऱ्याचे वितरण आदींची माहिती घेणे. 
  • 'आदित्य एल 1' द्वारे अवकाशात पहिली सौर वेधशाळा प्रस्थापित केली जाणार आहे. 
  • या यानामध्ये एकूण सात उपकरणे (पेलोड) आहेत.
  • यातील चार उपकरणे थेट सूर्याचा अभ्यास करतील तर उर्वरित तीन उपकरणे 'एल 1' बिंदूवरील क्षेत्राचे निरीक्षण करतील.

हेही वाचा : Total Solar Eclipse : सूर्यग्रहण म्हणजे काय? ते कसं दिसतं?

Topics mentioned in this article