जाहिरात

300 कोटींची मालकीण, नवऱ्याचं सेक्रेटरीसोबत अफेअर; मराठी महिला दक्षिण आफ्रिकेच्या घराघरात पोहोचली

Marathi News: दक्षिण आफ्रिकेमध्ये ही मराठी महिला बरीच प्रसिद्ध झाली असून, महाराष्ट्रातही ती सगळ्यांना परिचित आहे.

300 कोटींची मालकीण, नवऱ्याचं सेक्रेटरीसोबत अफेअर; मराठी महिला दक्षिण आफ्रिकेच्या घराघरात पोहोचली
मुंबई:

काही वर्षांपूर्वी एक मालिका आली होती, जिचं नाव होतं माझ्या नवऱ्याची बायको. या मालिकेमध्ये राधिका सुभेदारची भूमिका अनिता दाते-केळकरने साकारली होती. तिचा नवरा म्हणजेच गुरुनाथची भूमिका अभिजीत खांडकेकरने साकारली होती तर त्याच्या प्रेयसीची म्हणजेच शनायाची भूमिका रसिका सुनीलने साकारली होती. या मालिकेमध्ये नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे कोलमडलेली राधिका सुभेदार स्वत:चा मसाल्याचा बिझनेस सुरू करते आणि 300 कोटींची मालकीण होते असं दाखवण्यात आलं आहे. ही मालिका बंद होऊन एक काळ लोटला आहे, मग असं असताना अचानक या मालिकेची सोशल मीडियावर चर्चा का सुरू झाली आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. 

नक्की वाचा: फ्लॉप स्टोरी, टॉप अ‍ॅक्टिंग! 'द फॅमिली मॅन 3'चा रिव्ह्यू एकदा वाचाच

अण्णा नाईकांच्या X पोस्टने वादळ उठवलं

अफोलाबी सोकेये नावाच्या X युजरने एक पोस्ट केली होती. तुम्ही तुमच्या यशाचा मार्ग निवडण्यामागील कथा काय आहे असे साधासोपा प्रश्न त्याने विचारला होता. 


 

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अण्णा नाईक नावाचं X हँडल सरसावलं. या हँडलवरून 'माझ्या नवऱ्याची बायको'ची अख्खी स्टोरीच सांगण्यात आली.  

ही कथा वाचून दक्षिण आफ्रिकेतील  uBHEBHE या हँडलवरून राधिका सुभेदारचा फोटो पोस्ट करत प्रश्न विचारण्यात आला ही तूच आहे का ?
 

दक्षिण आफ्रिकेत हिट झालीय 'माझ्या नवऱ्याची बायको'

या पोस्टवरून सगळ्या जगाला कळालं की राधिका सुभेदारची कधा सातासमुद्रापार दक्षिण आफ्रिकेतही पाहिली जात असून तिथेही ही सिरीअल प्रचंड हिट झाली आहे. ही पोस्ट करणाऱ्या तरूणीने लिहिलंय की ही सिरीअल माझी आई बघत असते. तिच्यासोबत मी देखील मालिका बघायला लागले आणि आता मलाही ही मालिका पाहण्याची सवय लागली आहे. मला शनायाची भूमिका फार आवडलीय. यानंतर अनेकांनी शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आपल्याला आवडल्याचे म्हटले आहे. ही मालिका दक्षिण आफ्रिकेत झुलू भाषेत डब करून दाखवण्यात येत असून मालिकेला इंग्लिश सबटायटलही आहेत. 

नक्की वाचा: 90 च्या दशकातील 'ऐश्वर्या', 31 वर्षानंतर 'हा' फोटो झाला व्हायरल! लोक म्हणाले, "आजही राजकुमारीच.."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com