Who Is Instagram Influencer Atharva Sudame : सोशल मीडियावर आक्षेपार्ह कंटेन्ट शेअर करणाऱ्या इन्फ्लुएन्सर नेहमीच चर्चेचा विषय बनतात. पुण्यातील इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याचीही इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPL) बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केल्याचा आरोप सुदामेवर करण्यात आला आहे. परिवहन प्राधिकरणाची परवानगी न घेताच बसमध्ये रिल शूट केल्याने अथर्व चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण पुणे महानगर परिवहन महामंडळाने अथर्वला कायदेशीर नोटीस धाडली आहे. पण रीलस्टार अथर्व सुदामे हा नेमक आहे तरी कोण?असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. जाणून घेऊयात त्याच्या प्रोफाईलबाबत सविस्तर माहिती.
अथर्वने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये महिला कंडक्टरला आक्षेपार्ह पद्धतीत दाखवलं आहे. त्याने त्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा ठपकाही त्याच्यावर लावण्यात आलाय. त्याने बनवलेल्या रीलमुळे सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचंही पीएमपीएलच्या नोटिशीत म्हटलंय.या कृतीमुळे महामंडळाचे नियम,धोरणे आणि नैतिक गोष्टींचं उल्लंघन झाल्याचं पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
कोण आहे अथर्व सुदामे?
महाराष्ट्राचा कंटेन्ट क्रिएटर अथर्व सुदामे इन्स्टाग्राम रील्समुळे प्रकाशझोतात आला. अथर्वने सोसायट्यांमधील पारंपरिक रूढीवादी परंपरा, सण-उत्सव आणि कार्यक्रमांवर आधारित व्हिडिओ,संगीत आणि क्रिकेट व्हिडिओ यांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे. तो त्याच्या टीमसोबत लाईव्ह शो देखील करतो. 2023 मध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सुदामे यांचं कौतुक केलं होतं.“तुम्ही माझे आवडते आहात, मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो.”, असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
नक्की वाचा >> Pune News: अरारारारा! जेजुरी गडावर भरला गाढवांचा बाजार, भारतातील 'या' गाढवाला मिळाली सर्वात मोठी किंमत
अथर्व सुदामेचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान, अथर्व सुदामेचे इन्स्टाग्रामवर 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांनी उद्योजकांना सोशल मीडियाची ताकद कशी वापरावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अथर्वला गतवर्षी आमंत्रित करण्यात आलं होतं. मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी असलेल्या सुदामे यांनी मराठवाडा मित्र मंडळच्या कॉमर्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि 2023 मध्ये आपल्या दीर्घकाळच्या मैत्रीण रुचाशी विवाह केला.
नक्की वाचा >> आईने मुलांना साडी नेसवली, मेकअपही केला..दोघे भाऊ तृतीयपंथी बनून बाजारात गेले, 1 दिवसाची कमाई पाहून सर्वच थक्क
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world