Tallest Building In The World : दुबईतील 'बुर्ज खलिफा' जगातील सर्वात उंच इमारत असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. दुबईत जाऊन बुर्ज खलिफाजवळ फोटो काढावा,अशी अनेकांची इच्छा असते. बुर्ज खलिफा जगातील सुंदर इमारतींपैकी एक असल्याचंही बोललं जातं. पंरुत,आता बुर्ज खलिफाला टक्कर देणाऱ्या इमारतीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण, सौदीचे क्राउन प्रिन्स बुर्ज खलिफापेक्षा अधिक उंच इमारत बांधत आहेत. ही इमारत 'जेद्दा टॉवर' म्हणून ओळखली जाणार आहे. या टॉवरची उंची 1000 मीटर म्हणजेच एक किलोमीटर इतकी असेल. गल्फ न्यूजच्या माहितीनुसार, हा टॉवर 2028 पर्यंत तयार होईल. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे. म्हणजेच जेद्दा टॉवर बुर्ज खलिफापेक्षा किमान 172 मीटर अधिक उंच असेल. बुर्ज खलिफामध्ये एकूण 163 मजले आहेत,तर जेद्दा टॉवरमध्ये यापेक्षा अधिक मजले असणार आहेत.
2025 मध्ये पुन्हा सुरू झाले काम
2025 मध्ये हे बांधकाम पुन्हा सुरू झाले होते.सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांच्या व्हिजन 2030 अंतर्गत या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. ही इमारत सौदी अरेबियातील जेद्दा इकॉनॉमिक सिटीमध्ये उभारली जात आहे. हा अभियांत्रिकीचेा एक अप्रतिम नमुना ठरणार आहे,असं म्हटलं जात आहे.
नक्की वाचा >> Akluj Election : "घायल हू इसलिये..", BJP चा मोठा पराभव, कोणी जिंकल्या 26 पैकी 22 जागा? अकलूजचा 'धुरंधर' कोण?
आतापर्यंत 80 मजले पूर्ण
रिपोर्टनुसार, जेद्दा टॉवरमध्ये आतापर्यंत 80 मजले बांधले गेले आहेत. या इमारतीचे बांधकाम अतिशय वेगाने सुरू आहे. या इमारतीत सर्व अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. सुरुवातीला हे बांधकाम 2020 मध्येच पूर्ण होणार होते. 2011 मध्ये या इमारतीची घोषणा झाली होती. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर बांधकाम थांबवण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीचे 63 मजले बांधले गेले होते.परंतु,यावर्षीच्या सुरुवातीला काम पुन्हा सुरू झाले आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai: अजित पवारांना मोठा धक्का; CIDCO माजी संचालकांनी घेतला मोठा निर्णय? एका फोटोमुळे राजकारण तापणार
टॉवरमध्ये काय-काय असेल?
जेद्दा टॉवरमध्ये ऑफिसेस, हॉटेल्स आणि अपार्टमेंट्स असतील. या उंच टॉवरमध्ये ये-जा करण्यासाठी अतिशय वेगाने चालणाऱ्या लिफ्ट्स बसवल्या जातील, जेणेकरून येणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world