Elon Musk on 120 hours work : प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही काम आहे. आपल्याकडील काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा, त्या कामात ठसा उमटवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण, सध्या जगभरात किती तास काम केलं पाहिजे? याबाबत वाद सुरु आहे. मोठ्या कंपन्यांचे संस्थापक, सीईओ आणि संचालकांनी जास्त काम केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरा गटानं या मताला तीव्र विरोध केलाय. आता त्याचवेळी जगातील दिग्गज टेक्नॉलजी तज्ज्ञ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांचे निकटवर्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनीही लोकांना जास्त काम करण्याचा सल्ला दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मस्क यांचा सल्ला काय?
या पोस्टमध्ये टेस्लाच्या सीईओने सांगितलं की, 'आमचा सरकारी विभाग 120 तास काम करत आहे. तर आमचे नोकरशाह आठवड्यातून 40 तासच काम करतायत. याच कारणामुळे ते वेगानं मागे पडत आहेत.या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली टीम 120 तास काम करत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
( नक्की वाचा : 'बोनस हवाय! हवा तितका घेऊन जा...' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर Video Viral )
120 तासांची सरासरी काढली तर रोज 17 तास काम करावं लागेल. मस्क या पोस्टमधून इतरांनाही 120 तास काम करण्याचा सल्ला देत आहेत, असा अंदाज काढला जात आहे. मस्क यांच्या ट्विटवर अनेक जण नाराज झाले असून त्यांनी दीर्घकाळ काम केल्यानं होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला आहे.
'सरकारी काम करत असताना अनधिकृतपणे ओव्हरटाईम करणे अवैध आहे, असं मी शिकलोय. तसं केलं तर सरकारला भरपाई द्यावी लागते. गुलामी अवैध आहे. तर DOGE मधील सरकार कर्मचारी कायदेशीरपणे इतके तास कसं काम करत आहेत?' असा प्रश्न एका युझरनं विचारला आहे.
DOGE is working 120 hour a week. Our bureaucratic opponents optimistically work 40 hours a week. That is why they are losing so fast. https://t.co/dXtrL5rj1K
— Elon Musk (@elonmusk) February 2, 2025
तर, भरपूर काम करुन घेणे कमी पगार देणे ही टेक इंडस्ट्रमधील काळी बाजू आहे. कमी पगार देऊन त्यांना एकाचवेळी नोकरीवरुन कमी केलं जातं. याचा फक्त मालक फायदा उठवतात,' असं मत अन्य एका युझरनं व्यक्त केलं आहे. 120 तास काम करणारे लोकं आपल्या कुटुंबासोबत कसा वेळ घालवतात? मुलं, पार्टनर आणि प्रेम या गोष्टींसाठी त्यांच्याकडं काहीच वेळ नाही,' या शब्दात एका युझरनं नाराजी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world