जाहिरात

Apple Event 2024: iPhone 16 आज होणार लाँच, वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

Apple Event 2024 : अ‍ॅपल कंपनीचा बहूप्रतिक्षीत 'इट्स ग्लोटाईम' (It's Glowtime) सुरु होण्यास काही तास शिल्लक आहेत.

Apple Event 2024: iPhone 16 आज होणार लाँच, वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
Apple Event 2024 : 'अ‍ॅपल' चा हा कार्यक्रम त्यांच्या कॅलिफोर्निया, क्यूपर्टिनो येथील जगप्रसिद्ध स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये होणार आहे.
मुंबई:

जगभरातील टेक्नोप्रेमींसाठी उत्सुकता सध्या शिगेला पोहचली आहे. अ‍ॅपल कंपनीचा बहूप्रतिक्षीत 'इट्स ग्लोटाईम' (It's Glowtime) सुरु होण्यास काही तास शिल्लक आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅपल कंपनीचा या कार्यक्रमात काही महत्त्वाचे प्रोडक्ट लाँच करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर आणखी काही प्रोडक्टचे सादरीकरण देखील या कार्यक्रमात केले जाते. 

यावर्षी देखील कंपनी याच परंपरेचं पालन करेल अशी शक्तता आहे. नवा आयपोफन (New iPhones) आणि अ‍ॅपल वॉच (Apple Watches) या कार्यक्रमात लॉन्च होणार हे जवळपास नक्की आहे. सोमवारी (9 सप्टेंबर 2024) रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात काय होणार आहे? याबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील त्याची उत्तरं आम्ही देणार आहोत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी आणि कुठे कार्यक्रम पाहणार?

Apple 'इट्स ग्लोटाइम' इव्हेंट सोमवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 am PT / 1 pm ET वाजता अमेरिकेत सुरु होईल. भारतीय प्रेक्षक 9 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) Apple Event 2024 पाहू शकता. 

मी हा कार्यक्रम कसा पाहू शकतो?

तुम्ही हा कार्यक्रम 'अ‍ॅपल' ची अधिकृत वेबसाईट, यूट्यूब चॅनेल तसंच Apple TV app वर पाहू शकता. ऑनलाईन आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी अ‍ॅपल कंपनीकडून हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीम करण्यात येणार आहे. 

( नक्की वाचा : Apple iPhone 16 launch : 'या' तारखेला लॉन्च होणार आयफोनची नवी सीरिज, पाहा काय असेल खास )
 

कुठे होणार कार्यक्रम?

'अ‍ॅपल' चा हा कार्यक्रम त्यांच्या कॅलिफोर्निया, क्यूपर्टिनो येथील जगप्रसिद्ध स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये होणार आहे. कंपनीचे महत्त्वाचे लॉन्च आणि टेक इनोव्हेशनचे केंद्र अशी या थिएटरची ओळख आहे. 

Apple नवा आयफोन लाँच करणार आहे का?

iPhone 16 सीरिज हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल, अशी अपेक्षा आहे. Apple चार नव्या आयफोन मॉडेल्सचे अनावरण करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कॅमेरा तंत्रत्रान, प्रोसेसिंग पॉवर आणि डिस्प्ले वैशिष्ट्यांसह अनेक सुधारणा अपेक्षित आहेत. नव्या रंगांचे ऑप्शनसही दिले जाऊ शकतात. 

Apple Watch बद्दल काय माहिती आहे?

अ‍ॅपल कंपनी अ‍ॅपल वॉच सीरिज 10 देखील लॉन्च करु शकते. यामध्ये अधिक मोठे स्क्रीन, बारीक डिसाईन आणि अधिक टिकाऊपणा असेल. त्याचबरोबर काही हेल्थ फिचर्सचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. पण, याबीत अधिक माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. 

AirPods मध्ये अपडेट असेल का?

अ‍ॅपल कंपनी फोर्थ जनरेशन AirPods लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अधिक उत्तम ऑडिओ क्वालिटी, सुधारित नॉईज कॅन्सलेशन तसंच USB-C पोर्टचा समावेश असेल. पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन कमी किंमतीमध्ये मिळणार आहे. 

( नक्की वाचा : कर्मचाऱ्यांना Tinder Leave वर पाठवणार कंपनी, पूर्ण खर्चही करणार! काय आहे ऑफर? )
 

आणखी कोणते अपडेट अपेक्षित आहेत?

'अ‍ॅपल' या कार्यक्रमात  iOS 18 रिलिजची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचे लवकरच रोल आऊट होईल. त्याचबरोबर PadOS 18, watchOS 11 आणि  tvOS 18 या प्रॉडक्टच्या अपेडेट्सबाबतही माहिती दिली जाऊ शकते.

Apple कडून 9 सप्टेंबरच्या कार्यक्रमात नवीन प्रॉडक्ट्स लाँच होणार आहेत का?

'अ‍ॅपल'च्या परंपरेनुसार नवीन आयफोन आणि अ‍ॅपलचे लाँच या कार्यक्रमात केले जाऊ शकते. या कार्यक्रमानंतर लगेच हे दोन्ही प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील.

अ‍ॅपल 2024 मध्ये आणखी कोणता इव्हेंट होणार आहे का?

'अ‍ॅपल' कंपनीकडून साधरणपणे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमात  Mac आणि iPad अपडेट्सवर फोकस असतो. पण, यंदा  iPad  इव्हेंट मे महिन्यातच झाला. त्यामुळे पुढील कार्यक्रमात iPad बाबतच्या घोषणा कमी असू शकतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
उंचीवरुन लोक चिडवायचे, मात्र नीरज चोप्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी; नवदीपने थेट गोल्ड मिळवलं!
Apple Event 2024: iPhone 16 आज होणार लाँच, वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
Russia preparing to build direct nuclear power station on the moon
Next Article
ऊर्जेचं संकट सोडवण्यासाठी चंद्रावर अणुशक्ती केंद्र? रशिया, चीन आणि भारताचं मिशन