जाहिरात

Apple iPhone 16 launch : 'या' तारखेला लॉन्च होणार आयफोनची नवी सीरिज, पाहा काय असेल खास

Apple iPhone 16 launch : 'या' तारखेला लॉन्च होणार आयफोनची नवी सीरिज, पाहा काय असेल खास
ॲपल कंपनीचा महत्त्वाचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात होणार आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौ. रॉयटर्स)
मुंबई:

सप्टेंबर महिना जवळ येऊ लागताच सर्व मोबाईल युझर्सची प्रतीक्षा शिगेला पोहचली असते. याच महिन्यात टेक्नॉलजी क्षेत्रातील बलाढ्य ॲपल (Apple) कंपनी आयफोनची नवी सीरिज लॉन्च करते. अँड्रॉईंड कंपन्यांमध्ये कमी किंमतीमध्ये दर्जेदार मोबाईल फोन देण्याची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा गेल्या काही वर्षांपासून ॲपलच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. पण, त्यानंतरही आयफोनची क्रेझ कायम आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आयफोन 16 कधी लॉन्च होणार याची चर्चा सुरु होती. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनीनं आयफोन 16 लॉन्चची तारीख जाहीर केली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी होणार iPhone 16 लॉन्च?

ॲपल कंपनीनं 'इट्स ग्लोटाइम' नावानं होणाऱ्या खास कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवलं आहे.  स्टीव्ह जॉब्स थिएटर, क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. कंपनीनं नेहमीप्रमाणे आयफोन 16 किंवा अन्य कोणते प्रोडक्ट या कार्यक्रमात लॉन्च होणार याबाबत गुप्तता पाळली आहे. पण, या कार्यक्रमात iPhone16 सीरिजमधील चार नवे मॉडल - iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro और iPhone 16 Pro Max लॉन्च होण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. 

( नक्की वाचा : टेलिग्राम अ‍ॅपचे CEO पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समधून अटक, रशिया-युक्रेन युद्धाशी कसा आहे संबंध? )
 

iPhone 16 मध्ये खास काय?

- iPhone 16 सीरिजमध्ये ॲपल इंटेलिजेन्स फिचर्स असेल. त्याचबरोबर या सीरिजमधील कॅमेरा ॲपमध्ये तातडीनं फोटचो शूट करणे तसंच व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी एक नवं कॅप्चर बटन असण्याची शक्यता आहे. 

- याबाबत मिळालेल्या माहितीनुसार iPhone16 मध्ये महत्त्वाच्या हार्डवेअर अपडेटचा समावेश असेल. iPhone च्या चिपसेटला अपग्रेड केले जाऊ शकते. हे अपग्रेड व्हर्जन ॲपल इंटेलिजेन्सला सपोर्ट करेल. सध्या फक्त  iPhone 15 Pro आणि 15 Pro Max मध्ये आवश्यक प्रोसेसिंग पॉवर आहे. 

- iPhone 16 मध्ये स्क्रीन साईज थोडा मोठा असू शकतो. त्याचबरोबर कॅमेरा ॲरेच्या डिझाइनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 


- कॅमेरा अपग्रेड होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये झूम जेस्चर कंट्रोलची सूविधा देणारं कॅप्चर बटन असू शकतं. अर्थाही ही सुविधा लॉन्च होणाऱ्या सर्व मॉडलमध्ये असेल की फक्त प्रो मॉडलमध्ये असेल हे अद्याप स्पष्ट नाही. 

- iPhone 16 च्या युझर्ससाठी अनेक फिचर्सचा समावेश असेल. यामध्ये युझर्सना स्लो चार्जिंग, पासवर्ड विसरणे यासारख्या अडचणी समाप्त करण्यासाठी नव्या अपडेट्सचा समावेश असेल. 

- iPhone 16 प्रो मध्ये 3,577 mAh दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तर iPhone 16 Pro Max मध्ये 4,441 mAh  बॅटरी मिळू शकते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com