जाहिरात

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची भयंकर भविष्यवाणी, मोठे संकट येणार?

Baba Vanga predictions: बाबा वेंगाची ही भविष्यवाणी सहा दशकानंतरची असली, तरी आजच्या काळात बदलते हवामान, प्रयोगशाळेत तयार होणारे विषाणू आणि जैविक युद्ध यांचा वाढता धोका पाहता ही भविष्यवाणी गंभीर चिंतेचा विषय बनू शकते.

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची भयंकर भविष्यवाणी, मोठे संकट येणार?
Baba Vanga predictions
  • बाबा वेंगा ने 2088 में एक अनजान वायरस के फैलने और इंसानों की उम्र तेजी से घटने की भविष्यवाणी की है
  • बुल्गारिया की रहस्यवादी बाबा वेंगा को बाल्कन की नास्त्रेदमस के नाम से भी जाना जाता है
  • बाबा वेंगा का जन्म 1911 में नॉर्थ मैसेडोनिया में हुआ था और 12 वर्ष की उम्र में वे अंधी हो गईं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Baba Vanga predictions:  बुल्गारियाच्या बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या अनेकदा खऱ्या ठरल्या आहेत. आता बाबा वेंगा यांनी 63 वर्षांनंतर मानवांमध्ये एका विषाणूच्या संसर्गाबद्दल केलेली भविष्यवाणी चिंतेचा विषय ठरली आहे. बाबा वेंगा यांनी मानवांवर येणाऱ्या एका मोठ्या संकटाबद्दल अनेक वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून ठीक 63 वर्षांनंतर, म्हणजे 2088 मध्ये, जगात एक असा विषाणू पसरेल, ज्याची आपल्याला आज माहिती नाही. या विषाणूमुळे संक्रमित होऊन माणूस लवकर म्हातारा होऊ लागेल. याचाच अर्थ, मानवाचे आयुष्यमान वेगाने कमी होईल आणि ते लहान वयातच मृत्यूच्या जवळ जाऊ लागतील.

जरी बाबा वेंगाची ही भविष्यवाणी सहा दशकानंतरची असली, तरी आजच्या काळात बदलते हवामान, प्रयोगशाळेत तयार होणारे विषाणू आणि जैविक युद्ध यांचा वाढता धोका पाहता ही भविष्यवाणी गंभीर चिंतेचा विषय बनू शकते.

(नक्की वाचा- Film City in Nashik: नाशिकच्या इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी; काय आहे सरकारचा प्लान?)

कोण होत्या बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. त्यांना "बाल्कनची नास्त्रेदमस" म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म आजच्या नॉर्थ मैसेडोनियात 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी बवंडरमुळे त्यांची दृष्टी गेली. त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की दृष्टी गमावल्यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली. वयाच्या 30 वर्षांच्या आतच त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आणि उपचारांमुळे त्या जगभर प्रसिद्ध झाल्या.

त्यांची ख्याती इतकी वाढली की, सामान्य लोकच नव्हे तर बुल्गारियाचे राजा बोरिस तृतीय आणि सोव्हिएत नेते लिओनिद ब्रेझनेव्ह यांसारखे दिग्गजही त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत असत.

बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले, परंतु त्यांच्या भविष्यवाण्या आजही चर्चेत असतात. एका रिपोर्टनुसार, त्यांनी अमेरिकेतील 9/11 हल्ला आणि 2022 मध्ये ब्रिटनमध्ये आलेल्या भयंकर पुराची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यामुळे 2088 मध्ये येणाऱ्या 'जलद वृद्धत्वाच्या विषाणू'ची भविष्यवाणी गांभीर्याने घेतली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com