जाहिरात

2026 वर्ष महाविनाशकारी ठरणार? 'त्या'भविष्यवाणीची आता चर्चा का? नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?

या कवितांमधून राजकीय, नैसर्गिक आणि इतर संकटांचं भाकित वर्तवलं गेलं.

2026 वर्ष महाविनाशकारी ठरणार? 'त्या'भविष्यवाणीची आता चर्चा का? नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?
  • स्वित्झर्लंडमधील एका बारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे 40 लोकांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे
  • सौदी अरेबियाने युएईच्या दोन जहाजांवर हवाई हल्ला केला, ज्यामुळे अरब देशांमध्ये तणाव वाढला आहे
  • फ्रेंच ज्योतिषी नॉस्त्रेदमसने 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते अशी भविष्यवाणी केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

31 डिसेंबरची शेवटची रात्र होती. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांचा जल्लोष सुरू होता. पण हीच शेवटची रात्र स्वित्झर्लंडसाठी काळरात्र ठरलीय. एका बारमध्ये भीषण स्फोट झाला. 40 जणांनी आगीत होरपळून जीव गमावला. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जगाच्या एका ठिकाणी मृत्यूचं तांडव सुरू होतं. त्याचवेळी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात दोन देश युद्धाची तयारी करत होते.सौदी अरेबियाने युएईच्या दोन जहाजांवर हवाई हल्ला केला. सौदीच्या हल्ल्यात दोन्ही जहाजं उध्वस्त झाली. आता अरब देशांमधले दोन शक्तिशाली देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत. या दोन घटनांमुळे 2026 वर्ष जगासाठी किती घातक ठरू शकतं याची प्रचिती आलीय. त्याच वेळी पुन्हा एकदा फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्त्रेदमस याची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. त्याने आपल्या रहस्यमयी कवितांमधून तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीत 2026मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या खाईत ढकलू शकते,असा उल्लेख होता. त्यामुळे या घटनेनुसार नॉस्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरतेय का अशी चर्चा सुरू झाली आहे. नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. नॉस्त्रेदमस याच्या 2026 च्या भविष्यवाणीनुसार, 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे 2026 वर्ष जगासाठी घातक ठरू शकतं.धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांची हत्या करतील. असं नॉस्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये सांगितलंय. नॉस्त्रेदमस याने युद्ध, आर्थिक संकट, नैसर्गिक संकट अशा अनेक बाबतीच भविष्यवाणी केलीय.

नक्की वाचा - Trending News: स्पर्म घ्या,कोट्याधीश व्हा! महिलांसाठी ऑफर देणारा 100 मुलांचा बाप कोण? काय आहे त्याची घोषणा?

2026 मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या खाईत ढकलू शकते. एखाद्या देशाच्या चुकीच्या वर्तनामुळे समुद्री सीमांवर तणाव वाढेल.आणि तणावामुळे मोठी राष्ट्र एकमेकांसमोर युद्धासाठी उभी राहतील असं ही त्यांनी सांगितलं आहे.  नॉस्त्रेदमसने आपल्या पुढच्या भविष्यवाणीत जगावरील आर्थिक संकटाबाबत लिहलंय. ज्यानुसार आर्थिक महासत्ता अमेरिका, युनायटेड किंग्डम असे देश आर्थिक संकटात अडकतील. ज्यामुळे जगभरातील देशांवर महागाईचं संकट कोसळेल. अनेक देशांमध्ये महागाईमुळे अशांतीचं वातावरण निर्माण होईल. याशिवाय जगातील बड्या नेत्यांचा अस्त होईल असं भविष्यवाणीत लिहलंय.  नॉस्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये नैसर्गिक संकटांचाही उल्लेख केलाय. 2026 मध्ये भीषण गर्मीमुळे अनेक भागात दुष्काळ पडेल. त्यानंतर अचानक आलेल्या भयंकर पावसामुळे ठिकठिकाणी महापूर येईल. 2026 या वर्षाचा विनाशकारी वर्ष म्हणून उल्लेख केलाय. ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. नॉस्त्रेदमस याच्या भविष्यवाणीत AI चाही उल्लेख करण्यात आलाय. यानुसार 2026 वर्षात एआयचा प्रभाव अधिक वाढणार असून आर्टिफिशियल इंटेलिजंस फक्त कमांडनुसार चालणार नाही, तर एआय प्रणाली स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती मिळवू शकेल.  हळूहळू लोकांना एआयचं नियंत्रण आपल्या हातात राहिलं नाही याची जाणीव होईल.

नक्की वाचा - Weight Loss: वाढलेलं वजन आता एका इंजेक्शनने होणार कमी, 'मौनजारो' नक्की आहे तरी काय?

भविष्यावाणीत अणु हल्ल्याचा देखील उल्लेख आहे. काही देश अणु हल्ला करण्याची तयारी करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.  गहूसह धान्याच्या किंमती वाढण्याचे संकेत दिले आहेत. नॉस्त्रेदमसच्या एका भविष्यवाणीला फूड इंडस्ट्रीशी जोडलं जातंय. गहू आणि धान्याच्या किंमती 2026 या वर्षात वाढू शकात असे संकेत दिले आहेत.  आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल असं देखील म्हटलं आहे. एका ताकदवर व्यक्तीचा अचानक मृत्यू होईल असं ही त्यांनी सांगितलं आहे. एखाद्या मोठ्या प्रभावशाली व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो. हा मृत्यू दिवसाढवळ्या आणि अत्यंत धक्कादायक प्रमाणे होईल असं ही त्यांनी म्हटलं आहे. अनेकजण याला एखाद्या जागतिक नेत्याचा किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या अचानक मृत्यूशी जोडत आहेत. 

नक्की वाचा - पेरूला हिंदी मध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही

नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जगावर परमाणू हल्ल्याचंही संकट घोंघावतंय. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नॉस्त्रेदमसची ही भविष्यवाणी खरी ठरते की काय अशी भीती वाटतेय. पण ज्या नॉस्त्रेदमसची भविष्यवाणी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलीय, तो नॉस्त्रेदमस नेमका आहे तरी कोण हे जाणून  घेऊयात. नॉस्ट्रेदमस हा 16 व्या शतकातील एक फ्रेंच ज्योतिषी आहेत. त्यांचा जन्म 1503 मध्ये फ्रान्समध्ये झाला. त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. प्लेगच्या काळात डॉक्टर म्हणून काम केलं. त्यांनी ज्योतिष आणि गूढ विद्येचा अभ्यास केला होता. नॉस्त्रेदमस  यांनी 'लेस प्रोफेसीज'या पुस्तकात चार ओळींच्या कविता लिहिल्या आहेत.  या  कवितांमधून राजकीय, नैसर्गिक आणि इतर संकटांचं भाकित वर्तवलं गेलं. फ्रान्सची राणी कॅथरीन डी मेडिसी यांच्या दरबारात त्यांना स्थान मिळालं होतं. त्यांच्या काही भाकितांचा संबंध फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियन आणि हिटलर यांच्या उदयाशी जोडला जातो.अशा या प्रसिद्ध भविष्यवक्त्याची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय झालीय. आजही अनेक लोक नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. जरी अनेक अभ्यासक त्यांच्या भाकितांना अलौकिक शक्ती मानत नसले, तरीही त्यांचं गूढ लेखन जगभरातील लोकांना आकर्षित करतं. आता नॉस्त्रेदमसची भविष्यवाणी नव्या वर्षात कितपत खरी ठरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

नक्की वाचा - रिकाम्या पोटी विड्याचे पान खाल्ल्याने काय होतं? औषधी गुण जाणून व्हाल थक्क

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com