जाहिरात

Bill Gates : लग्न मेलिंडाशी अन् प्रेम रशियन महिलांशी; बिल गेट्स यांच्या कबुलीने जगभरात खळबळ, एपस्टीनचंही नाव..

Bill Gates Admits to Affairs with Russian Women: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वादग्रस्त उद्योगपती जेफ्री एपस्टीनसोबतच्या संबंधांबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Bill Gates : लग्न मेलिंडाशी अन् प्रेम रशियन महिलांशी; बिल गेट्स यांच्या कबुलीने जगभरात खळबळ, एपस्टीनचंही नाव..
Bill Gates : बिल गेट्स यांच्या कबुलीनं जगभर खळबळ उडाली आहे.
मुंबई:

Bill Gates Admits to Affairs with Russian Women: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वादग्रस्त उद्योगपती जेफ्री एपस्टीनसोबतच्या संबंधांबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मान्य केले की, मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्याशी लग्न झालेले असताना त्यांचे दोन रशियन महिलांसोबत प्रेमसंबंध होते.

या कबुलीमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा खळबळ माजली असून गेट्स यांनी या चुकीबद्दल जाहीर माफीही मागितली आहे. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी एका टाऊन हॉल सभेदरम्यान समोर आली असून बिल गेट्स यांनी आपल्या भूतकाळातील निर्णयांवर पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

कौटुंबिक आयुष्यातील वाद आणि रशियन महिला

बिल गेट्स यांनी सांगितले की, ज्या दोन महिलांशी त्यांचे संबंध होते त्यातील एक रशियन ब्रिज प्लेयर होती, जिला ते एका स्पर्धेदरम्यान भेटले होते. दुसरी महिला रशियन न्यूक्लियर फिजिसिस्ट (अणुभौतिकशास्त्रज्ञ) होती, जिच्याशी त्यांची ओळख व्यावसायिक कामाच्या निमित्ताने झाली होती. 

गेट्स यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांनी या संबंधांची माहिती जेफ्री एपस्टीनला दिली होती. यापूर्वी अशा चर्चा होत्या की एपस्टीनने या प्रेमसंबंधांचा वापर करून गेट्स यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता, विशेषतः ब्रिज प्लेयर मिला अँटोलोव्हा हिच्याशी असलेल्या संबंधांवरून हा वाद रंगला होता.

( नक्की वाचा : IDFC FIRST Bank : बँकिंग क्षेत्रात खळबळ: 590 कोटींचा 'महाघोटाळा'; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीनं बँकच लुटली! )

जेफ्री एपस्टीनसोबतचे कनेक्शन आणि पश्चात्ताप

या सभेमध्ये गेट्स यांनी गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबतच्या मैत्रीवरही भाष्य केले. त्यांनी मान्य केले की एपस्टीनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची योग्य तपासणी करण्यात ते अपयशी ठरले. त्यांनी सांगितले की 2014 पर्यंत त्यांनी एपस्टीनच्या भेटी घेतल्या होत्या आणि किमान एकदा त्याच्या प्रायव्हेट जेटने प्रवासही केला होता. 

मात्र, एपस्टीनच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये आपला सहभाग नव्हता किंवा त्याच्या खासगी बेटावर आपण कधीही गेलो नव्हतो, असा दावा गेट्स यांनी केला आहे. मी काहीही चुकीचे केले नाही आणि मला त्याच्या अवैध कामांची कल्पना नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीलाच, थकबाकी आणि वाढीव भत्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर )

मेलिंडा यांचा विरोध आणि फाउंडेशनवर परिणाम

बिल गेट्स यांनी आपल्या बोलण्यात माजी पत्नी मेलिंडा यांचा उल्लेख करत सांगितले की, मेलिंडा यांना एपस्टीनसोबतच्या मैत्रीबद्दल नेहमीच शंका होती आणि त्यांनी या संबंधांना विरोध केला होता. ही मैत्री बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या मूल्यांच्या विरोधात होती, याची कबुलीही त्यांनी दिली. 

या चुकीमुळे फाउंडेशनशी संबंधित इतर लोकांच्या प्रतिमेला तडा गेला, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. 1994 ते 2021 या प्रदीर्घ वैवाहिक प्रवासानंतर बिल आणि मेलिंडा यांचा घटस्फोट झाला होता, ज्यामध्ये गेट्स यांची ही अफेअर्स आणि एपस्टीनसोबतची मैत्री ही मुख्य कारणे असल्याचे मानले जाते.

फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, बिल गेट्स सध्या जगातील 18 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 107.3 बिलियन डॉलर्स इतकी अंदाजित आहे. इतकी मोठी संपत्ती आणि जागतिक प्रतिष्ठा असूनही, जुन्या चुकांमुळे त्यांना सार्वजनिक व्यासपीठावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आपल्या चुकीच्या निर्णयांनी फाउंडेशनच्या ध्येयांना धक्का लागल्याचे सांगत त्यांनी भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com