
ब्राझीलमध्ये अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी आहेत. एका कारला देखील बसने धडक दिली. बसमधली जवळपास सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामधील 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. बसचा अतिशय वेगात होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रकही वेगात होता. अचानक बसचा टायर फुटला. त्यांतर अनियंत्रित बस ट्रकला जाऊन धडकली. बस आणि ट्रक वेगात असल्याने स्फोट होऊन बसला आग लागली.
A crash between a passenger bus and a truck killed 22 people on a highway in Minas Gerais, a state in southeastern Brazil.
— Boar News (@PhamDuyHien9) December 21, 2024
A packed bus with 45 passengers blew a tire, causing the driver to lose control and collide with an oncoming truck carrying tiles. The bus burst into… pic.twitter.com/g3hPszBfpD
बसला आग लागल्यानतंर बसमधील प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी धडपत केली. प्रवाशांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होता. अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनीही आरडाओरडा सुरू केला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यांतर बचावकार्य सुरू झाले. बसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फॉरेन्सिक तपासणीनंतरच अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल. ब्राझीलच्या वाहतूक मंत्रालयाच्या नोंदीनुसार, 2024 मध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला आहे. सप्टेंबर 2024 मध्येही ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंनी भरलेली बस उलटली होती. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world