Brazil Bus Accident : भरधाव बस ट्रकला धडकली अन् पेट घेतला; 38 जणांचा होरपळून मृत्यू

Brazil Bus Accident : मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामधील 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

ब्राझीलमध्ये अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी आहेत.  एका कारला देखील बसने धडक दिली. बसमधली जवळपास सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामधील 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. बसचा अतिशय वेगात होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रकही वेगात होता. अचानक बसचा टायर फुटला. त्यांतर अनियंत्रित बस ट्रकला जाऊन धडकली.  बस आणि ट्रक वेगात असल्याने स्फोट होऊन बसला आग लागली.

बसला आग लागल्यानतंर बसमधील प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी धडपत केली. प्रवाशांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होता. अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनीही आरडाओरडा सुरू केला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यांतर बचावकार्य सुरू झाले. बसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

फॉरेन्सिक तपासणीनंतरच अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल. ब्राझीलच्या वाहतूक मंत्रालयाच्या नोंदीनुसार, 2024 मध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला आहे. सप्टेंबर 2024 मध्येही ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंनी भरलेली बस उलटली होती. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता.
 

Topics mentioned in this article