जाहिरात

Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कॅनडाकडूनही प्रत्युत्तर; जगात टॅरिफ वॉरची भीती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं केलंय.

Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कॅनडाकडूनही प्रत्युत्तर; जगात टॅरिफ वॉरची भीती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं केलंय. चीन, कॅनडा आणि मेक्सिको तिन्ही देशांमधून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर कर वाढवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. कॅनडा आणि मेक्सिकोनंही अमेरिकेतील मालावर तितकंच आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रत्यक्ष युद्धाऐवजी जगात टॅरिफ वॉर सुरू होताना दिसतंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ट्रम्प सरकारच्या निर्णयानंतर, चिनी मालावरील आयात शुल्कात 10 टक्के, कॅनडाच्या मालावरील आयात शुल्कात 25 टक्के, तर मेक्सिकोवरील आयात शुल्कात 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. शिवाय इतर गोष्टी आणि इतर देशांवरही अतिरिक्त आयात शुल्क लावण्यात येईल असं सुतोवाच ट्रम्प यांनी यावेळी केलंय. ट्रम्प यांनी आयात कर वाढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी अमेरिकन मालावर तेवढाच अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला. तिकडे मेक्सिकोनंही अमेरिकन मालावर शुल्क लावत जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅरिफ वॉर म्हणजे दोन देशांमधील आर्थिक युद्ध. याअंतर्गत एक देश दुसऱ्या देशाच्या निर्यातीवर जास्त कर लादतो.

चीनच्या DeepSeek ने जगभरातील टेक कंपन्यांची उडवली झोप; अमेरिकन शेअर बाजारावर परिणाम

नक्की वाचा - चीनच्या DeepSeek ने जगभरातील टेक कंपन्यांची उडवली झोप; अमेरिकन शेअर बाजारावर परिणाम

अमेरिकनं लावलेल्या करांचा जसा आम्हाला फटका बसणार आहे तसाचा आमच्या प्रतिसादाचा त्यांनाही फटका बसणार आहे. आमच्या प्रतिसादानं अमेरिकेत रोज वापराच्या गोष्टी महाग होणार आहेत. फळं, भाज्या, बिअर, परफ्यूम, कपडे, बूट ...अशा सगळ्या वस्तू महाग होतील. घरगुती वापरच्या वस्तू, फर्निचर, क्रीडा साहित्य असं सगळं काही महागणार आहे. आम्ही काही अमेरिकेतून येणाऱ्या मालावर सूटही देण्याचा विचार करतोय. पण या कठीण काळात कॅनडाची जनता खंबीर पणे उभी राहील याची मला खात्री आहे. जगातला सगळ्यात चांगला शेजारी म्हणून आमचा लौकीक कायम राहील याची मला खात्री आहे, असं मेक्सिकोचे पंतप्रधान क्लॉडिया शेनिनबाग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ट्रम्प यांच्या निर्णयानं अकारण टॅरिफ वॉर सुरु होईल आणि त्याचा फटका जगभरातील ग्राहकांनाच बसेल असं मत चीन वंशाचे अर्थतज्ज्ञ व्यक्त करतायत. या अशा टॅरिफ वॉरमधून कुणाचचं भलं होत नाही. कारण आयात शुल्क वाढल्याने उत्पादनाची किंमत वाढते आणि अंतिमतः त्याचा भार ग्राहकांवरच येतो. म्हणजे आयात कर वाढल्याने ज्या अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना निवडून दिलंय त्याच जनतेवर महागाईची कुऱ्हाड पडणार आहे, असं आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सिक्स विद्यापीठाचे डीन ल्यू बाओचेंग म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: