जाहिरात

Elon Musk: एलॉन मस्क यांच्यावर चीनची करडी नजर? मेजवानीत वेट्रेस बनून वावरत होती चिनी जनरल! वाचा संपूर्ण प्रकरण

China Spying Elon Musk: चीन आणि अमेरिकेतील गुप्तहेर युद्धाची एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे

Elon Musk: एलॉन मस्क यांच्यावर चीनची करडी नजर? मेजवानीत वेट्रेस बनून वावरत होती चिनी जनरल! वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई:

China Spying Elon Musk: चीन आणि अमेरिकेतील गुप्तहेर युद्धाची एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बीजिंग दौऱ्यादरम्यान एका बड्या चिनी जनरलने चक्क वेट्रेसचा वेश परिधान करून एलॉन मस्क यांच्यावर पाळत ठेवल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध ब्लॉगरने हा दावा केल्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, चीनच्या गुप्तहेरगिरीच्या या नव्या पद्धतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण?

जेनिफर झेंग या स्वतंत्र ब्लॉगरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे. चीनमध्ये आयोजित एका भव्य मेजवानीदरम्यान एलॉन मस्क यांच्या अगदी मागे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये उभी असलेली महिला ही साधी वेट्रेस नसून चीनच्या लष्करातील एक उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं झेंग यांनी म्हटलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार, ही महिला मेजर चेंग चेंग असून ती चीनच्या एलिट बटालियनची कमांडर आहे. इतकंच नाही तर, लष्करी समारंभांची नियमावली लिहिण्यात तिचा मोठा वाटा असल्याचंही सांगितलं जात आहे.

( नक्की वाचा : Immortality by 2030 : मृत्यूवर विजय मिळवणं आता शक्य? 2030 पर्यंत माणूस होणार अमर! वाचा काय आहे नवं तंत्रज्ञान )

लाल ड्रेसच्या आत दडलं होतं काय?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेनिफर झेंग यांनी असा संशय व्यक्त केला आहे की, त्या वेट्रेसच्या लाल ड्रेसच्या आत एखादं शस्त्र किंवा पिस्तूल दडवलेलं असू शकतं. चीनने अशा प्रकारे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना वेश पालटून पाहुण्यांच्या आणि उद्योजकांच्या अगदी जवळ कसं ठेवलं, याचे काही फोटो सध्या चिनी सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहेत. चीनने परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली ही हेरगिरी केल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.

काय आहे चीनचा इतिहास?

चीनवर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही फँग फँग नावाच्या एका महिलेने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील राजकारण्यांना आपल्या जाळ्यात ओढून गुप्त माहिती काढल्याचं प्रकरण गाजलं होतं. पाश्चात्य गुप्तहेर संघटनांनी वारंवार असा इशारा दिला आहे की, चीन कॉर्पोरेट क्षेत्रात आणि राजनैतिक वर्तुळात आपले लोक साध्या वेषात पेरून ठेवतो. विशेषत: मोठे टेक लीडर्स चीनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वाटाघाटी करतात, तेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारे छुप्या पद्धतीने लक्ष ठेवलं जातं.

आरोपांचे गांभीर्य आणि सत्यता

जेनिफर झेंग यांनी यापूर्वीही खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात असल्याचे आणि भारताला बदनाम करण्याचा त्यांचा कट असल्याचे दावे केले होते. दरम्यान, या ताज्या प्रकरणावर चीन सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, एलॉन मस्क यांच्या मागे उभी असलेली महिला खरंच लष्करी अधिकारी आहे का, याची NDTV नेटवर्कनं स्वतंत्रपणे खातरजमा केलेली नाही. मात्र, या नव्या दाव्यामुळे चीनच्या आदरातिथ्यामागे हेरगिरीची मोठी किंमत मोजावी लागते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com