जाहिरात

Heart Attack Symptoms: तरुणांमध्ये हार्ट अटॅकसाठी ब्लॉकेज नव्हे तर Plaque Rupture कारणीभूत, या 6 लोकांना धोका

Heart Attack Symptoms: आजच्या तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यामागील ब्लॉकेज नव्हे तर प्लॅक रप्चर ही स्थिती कारणीभूत ठरतेय, असे डॉक्टरांचे म्हणणंय. या स्थितीमध्ये हृदयाची काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती....

Heart Attack Symptoms: तरुणांमध्ये हार्ट अटॅकसाठी ब्लॉकेज नव्हे तर Plaque Rupture कारणीभूत, या 6 लोकांना धोका
"Plaque Rupture : तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका वाढण्यामागील हे आहे कारण"
Canva
  • तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका प्लॅक रप्चरमुळे वाढतोय
  • प्लॅक रप्चरचा धोका कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी
  • खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड वाढल्याने प्लॅक अस्थिर होतो आणि ते फुटण्याचा धोका वाढतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Heart Attack Symptoms: तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढतंय. पण आजच्या तरुणांना हार्ट अटॅक ब्लॉकेजमुळे नाही तर प्लॅक रप्चरमुळे येत आहेत आणि हीच सर्वात धोकादायक गोष्ट असल्याची माहिती डॉक्टर रविंद्र कुलकर्णी यांनी दिलीय. ऑफिसमधील ताण, उशीरा रात्रीपर्यंत जागं राहणं, जंक फुड, धूम्रपान यामुळे प्लॅकचे प्रमाण इतकं अस्थिर होतं की केवळ 30–40 टक्के ब्लॉकेज असतानाही शंभर टक्के अचानक ब्लॉक तयार होतो, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

प्लॅक म्हणजे काय आणि काय आहेत याचे धोके? | What Is Plaque Rupture?

धमन्यांच्या भिंतीमध्ये खराब कोलेस्टेरॉल, दाह आणि फॅट्स मिळून मऊ गाठ तयार होते. ही गाठ आकाराने लहान जरी असली तरीही ती फुटल्यानंतर काही सेकंदांतच रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. पुढील कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते...

  1. खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड प्लॅक अस्थिर करतात. 
  2. खराब कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे प्लॅक मऊ पडते.
  3. ट्रायग्लिसेराइडच्या उच्च पातळीमुळे प्लॅकमध्ये दाह वाढतो.
  4. दोन्ही गोष्टींमुळे प्लॅक फुटण्याचा धोका वाढतो.

तरुणांमध्ये प्लॅक रप्चर या स्थितीचा धोका जास्त का वाढतोय?

  1. जास्त प्रमाणात ताण असणे, अतिविचार करणे
  2. धूम्रपान करणे
  3. जंक फुड आणि हाय कोलेस्टेरॉल
  4. अपुरी झोप
  5. व्यायाम न करणे   

रप्चर फाटल्याने काय होते?

रप्चर फाटल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊन ब्लॉक तयार होऊ शकतात. रप्चर फाटल्याने प्लेटलेट तिथे पटकन चिकटतात. यामुळे काही सेकंदांमध्येच रक्त गोठते आणि पूर्णपणे ब्लॉक तयार होऊन अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची भीती निर्माण होऊ शकते. म्हणूनच सर्व रिपोर्ट्स सामान्य असतानाही तरुणांना हृदयविकाराचा झटका येतो. 

Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर

(नक्की वाचा: Stomach Cleaning Tips: गरम पाण्यात मिक्स करा ही 1 गोष्ट, आतड्यांमधील सर्व घाण एकाच दिवशी पटकन येईल बाहेर)

प्लॅकची पातळी स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचे काय?

  1. खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे.
  2. धूम्रपान करणे टाळावे. 
  3. नियमित व्यायाम करणे.  
  4. सात ते आठ तास झोपणे. 
  5. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे. 

Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद

(नक्की वाचा: Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद)

कोणत्या तरुणांनी विशेष काळजी घ्यावी?

  1. हृदयविकारांचा कौटुंबिक इतिहास
  2. मधुमेह / लठ्ठपणा / फॅटी लिव्हर
  3. उच्च ट्रायग्लिसराइड्सची समस्या
  4. ताणतणावानंतर छातीत जडपणा जाणवणे
  5. बैठी जीवनशैली
  6. High ApoB
डॉक्टर रविंद्र कुलकर्णी यांची पोस्ट

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com