जाहिरात
Story ProgressBack

अमेरिका आणि भारताच्या EVM मध्ये काय आहे फरक? कोणत्या देशातील अधिक सुरक्षित? वाचा सर्व माहिती

भारतीय ईलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि अमेरिकन ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन यामध्ये काय फरक आहे? ते कसे काम करतात हे जाणून घेऊया

Read Time: 4 mins
अमेरिका आणि भारताच्या EVM मध्ये काय आहे फरक? कोणत्या देशातील अधिक सुरक्षित? वाचा सर्व माहिती
भारत आणि अमेरिकेतील EVM मध्ये काय आहे फरक?
मुंबई:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कनं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (EVM) प्रश्न उपस्थित केला आहे. EVM बंद करा अशी मागणी त्यांनी केलीय. कोणताही व्यक्ती किंवा AI च्या माध्यमातून EVM हॅक करता येईल, असा मस्क यांचा दावा आहे. माजी माहिती आणि प्रसारण मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या दाव्याला उत्तर दिलंय. भारतीय इव्हीएम वेगळ्या पद्धतीनं डिझाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे ते अधिक सुरक्षित असून कोणत्याही मीडियाशी जोडलेले नाहीत. त्यामुळे ते हॅक करणे शक्य नाही, असं चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलंय.

भारतीय ईलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि अमेरिकन ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन यामध्ये काय फरक आहे? ते कसे काम करतात हे जाणून घेऊया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अमेरिकेत बॅलेट पेपरवर भर

अमेरिकेतील मतदानाच्या प्रक्रियेवर नजर ठेवणाऱ्या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2002 मधील मध्यावधी निवडणुकीत नोंदणीकृत 70 टक्के मतदारांनी बॅलेट पेपरनं मतदान करण्यास प्राथान्य दिलं. मतदार त्यांच्या हातांनी बॅलेट पेपरवर शिक्का मारतात. त्या बॅलेट पेपरना मशिनच्या माध्यमातून स्कॅन केलं जातं. अगदीच अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पेपर्सनं हातांनी मोजले जातात. 

त्या निवडणुकीत 23 टक्के मतदारांनी बॅलेट मार्किंग डिव्हाईस (BMD) चा वापर केला. या मतदारांनी मशीनच्या माध्यमातून त्यांचं मत दिलं. त्यांचं प्रिंटआऊट काढलं जातं. त्याला मशिनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात येते. 

( नक्की वाचा : 'EVM  हटवा', एलन मस्क असं का म्हणाले? कुठल्या निवडणुकीत झाला होता गोंधळ? )
 

अमेरिकेतील EVM

सात टक्के मतदारांनी डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिकचा  (DRE) वापर केला. डीआरईच्या मेमरीमध्ये मत सेव्ह केले जातात. या मशिनच्या माध्यमातून मतांचे रेकॉर्डही मिळतात. या यंत्रणेचा वापर करण्याची संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. 2004 साली 28.09 टक्के मतदारांनी त्यांचं मत डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या माध्यमातून दिलं. 

डीआरआयच्या टचस्क्रीन व्होटिंग मशिनमधून कोणताही बॅलेट पेपर निघत नाही. त्याचं ऑडित होत नाही. त्याचबरोबर त्याची पडताळणीही केली जात नाही. त्यामुळे मतदारांना कोणत्याही गोंधळाचा पत्ता लागत नाही. हा गोंधळ टाळण्यासाठी व्होट व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल (VVPAT) देखील योग्य माहिती देण्यात अपयशी ठरले आहे.

अमेरिकन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मताचे बॅकअप आणि त्याचा कोणताही फिजिकल रेकॉर्ड नाही, ही याची सर्वात मोठी कमतरता मानली जाते. ही मशिन हॅक किंवा खराब होणार नाही, यावर निवडणूक अधिकाऱ्यांना विश्वास ठेवणे भाग आहे.

( नक्की वाचा : 'ईव्हीएमला मोबाईल जोडता येत नाही'; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण )
 

अमेरिकन EVM च्या विश्वासहर्तेवर संकट

अमेरिकेत डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक बनवण्याचं काम वेगवेगळ्या कंपन्या करतात. त्यामुळे त्याच्या विश्वासर्हतेवर शंका व्यक्त केली जात आहे. मतदान करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा आणि मशिनचा वापर करणार हे ते राज्य ठरवतं. अनेकदा याचं बजेट देखील कमी असतं. 

अमेरिकेतील बहुतेक ईव्हीएम थेट इंटनेटशी जोडलेले नसतात. त्यामुळे ते हॅक करता येतात की नाही हे निश्चित सांगता येत नाही. प्रत्येक निवडणुकीच्यापूर्वी इव्हीएमचे प्रोग्रॅमिंग केले जाते. त्यामध्ये सर्व उमेदवारांची माहिती टाकली जाते. हे काम इलेक्शन मॅनेटमेंट सिस्टमच्या (ECS) माध्यमातून केले जाते. हे काम बहुतेक वेळा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपनं केलं जातं. या लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा वापर दुसऱ्या कामासाठी देखील केला जातो. या दरम्यान ते इंटरनेटशी कनेक्टेड असतात. हॅकर्स त्याचा वापर करु शकतात. त्यामध्ये कोणतेही व्हायरस टाकू शकतात.  

भारतामधील EVM कसं असतं?

भारतीय EVM हे बॅटरीवर चालते. हे मशिन मतदानाचा रेकॉर्ड करतं. मतमोजणी करतं. या मशिनचे तीन भाग असतात. यामधील पहिला भाग कंट्रोल युनिट (सीयू), दुसरा भाग बॅलेटिंग युनिट (बीयू) हे दोन्ही मशिन पाच मीटर लांब एका तारेला जोडलेली असतात. तो तिसरा भाग असतो व्हीव्हीपॅट. 

Latest and Breaking News on NDTV

बॅलेट युनिटवरील बटन दाबून मतदार मत नोंदवतो. दुसऱ्या युनिटमध्ये मत स्टोर केले जाते. एका बॅलेट युनिटमध्ये 16 उमेदवारांचे नाव रेकॉर्ड केले जातात. जास्त उमेदवार असतील तर अतिरिक्ट बॅलेटिंग युनिट्सना कंट्रोल युनिटनं जोडता येतं. निवडणूक आ.योगानुसार या प्रकारचे 24 बॅलेटिंग युनिट एकत्र जोडता येतात. यामध्यमातून नोटासह 384 उमेदवारांसाठी मतदान केलं जातं. कंट्रोल युनिट बूथ मतदान अधिकाऱ्याकडं असतं. बॅलेट युनिट तीन बाजूनी बंदिस्त असतं. तिथं मतदार मत देतात.  

उमेदवारांची नावं कुठे रेकॉर्ड होतात?

बॅलेट युनिटवर पक्षाची चिन्ह आणि उमेदवारांची नावं असतात. त्यावर उमेदवारांचा एक लहान फोटो देखील असतो. प्रत्येक उमेदवारासमोर एक निळं बटण असतं. ते बटण दाबून मतदान केलं जातं. मतदान केंद्रावर शेवटचं मत टाकल्यानंतर मतदान अधिकारी कंट्रोल युनिटवरील क्लोज बटन दाबतात. त्यानंतर इव्हीएममध्ये कोणतंही मत देता येत नाही. मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिटवरील रिझल्ट बटण दाबावे लागते. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळतात हे समजते. 

मतदारांना त्यांनी नोंदवलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPT) या मशिनच्या माध्यमातून पाहाता येते. 

Latest and Breaking News on NDTV

EVM चे प्रोग्रॅमिंग

EVM च्या आत एक मायक्रोप्रोसेसर असते. ते फक्त एकदाच प्रोग्रॅम करता येते. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. त्यामध्ये दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर टाकता येत नाही. ईव्हीएम बॅटरीवर चालते. वीजेवर नाही. 

भारतामध्ये ईव्हीएम संरक्षण मंत्रालयाच्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिडेट (बंगळुरु) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (हैदराबाद) एकत्र बनवतात.  ईव्हीएमच्या जुन्या मॉडलमध्ये 3840 मतं टाकता येत होते. नव्या मॉडेलमध्ये 2000 मतं टाकता येतात. एक ईव्हीएम मशिन तयार करण्यासाठी जवळपास 8700 रुपये खर्च होतात. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
PM मोदी आणि पोप यांचा फोटो शेअर करुन फसली काँग्रेस, माफी मागण्याची आली वेळ
अमेरिका आणि भारताच्या EVM मध्ये काय आहे फरक? कोणत्या देशातील अधिक सुरक्षित? वाचा सर्व माहिती
uK man sues apple after wife devorce due to Iphone unknown feature
Next Article
iphone च्या एका फीचरमुळे मोडलं लग्न; व्यक्तीने कंपनीविरोधात ठोकला दावा
;