जाहिरात

Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार

या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला. 

Donald Trump oath:  अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार

 Donald Trump Oath Ceremony:  अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शपथ घेतली. प्रचंड थंडी असल्याने अमेरिकन 40 वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथग्रहण कॅपिटल हिलच्या रोटुंडा हॉलमध्ये हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला. 

अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 10 वाजून 30 मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडला.  सर्वप्रथम जेडी व्हान्स यांनी उप राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली त्यानंतर चिफ जस्टीस जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. डोनाल्ड ट्रंप यांची कन्या ट्रम्प यांची मुले इवांका ट्रंप, डोनाल्ड ट्रंप ज्युनियर, टिफनी ट्रंप, एरिक ट्रंप आणि बॅरन ट्रंप हे घरातील सदस्यही यावेळी शपथविधीला उपस्थित होते. 

पहिल्या भाषणात काय म्हणाले?

अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आपण आपले सार्वभौमत्व राखू. जग आपला वापर करू शकणार नाही. आता अमेरिकेत घुसखोरी होणार नाही.  अमेरिका प्रथम ही आपली भूमिका राहाणार आहे. आपली सुरक्षा ही महत्वाची आहे.अमेरिकेला पहिल्या पेक्षा जास्त मजबूत बनवणार असून जगात अमेरिकेचा पुन्हा एकदा सन्मान होईल, असं प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. 

तसेच 'देवाने अमेरिकेला वाचवले. जी घुसखोरी होत आहे ती तातडीने थांबली जाईल. घुसखोराना यापुढे रोखलं जाईल.कृष्णवर्णियांनी समर्थन दिले त्यासाठी त्यांचे आभार. मार्टन ल्युथर किंग यांचे स्वप्न पुर्ण करणार आहे. अमेरिका मेक्सिको सीमेवर आणीबाणीची घोषणा करत आहे. एनर्जी इमर्जन्सीची ही घोषणा करत आहे.जे कायद्याचे पालन करत आहेत तेच अडचणीत आहेत. त्यांचे संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. सर्वांबरोबर घटने प्रमाणे समानतेने वागणार, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. दुसऱ्यांच्या युद्धात अमेरिकेचे सैन्य जाणार नाही.  शिवाय ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांना दहशतवादी समजले जाईल अशी घोषणाही यावेळी ट्रम्प यांनी केली.   
 

नक्की वाचा - $TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा

 दरम्यान,  या शपथविधी सोहळ्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील सेंट जॉन एपिस्कोपल या चर्चमध्ये प्रार्थना सभा झाली. त्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्नी मेलोनिया ट्रम्प, मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये चहा घेतला. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. शहरात 25,000 हून अधिक कायदा अंमलबजावणी आणि लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी ३० मैलांपेक्षा जास्त लांबीचे अँटी-स्केल कुंपण बसवण्यात आले होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com