Breaking News : भारताविरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तुर्कीच्या मालावर मसाले आणि सुकामेवा संघटनेने ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कारानंतर आता मसाले आणि सुकामेवा व्यापाऱ्यांनी 'बॅन तुर्की'चा अवलंब केला आहे. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला आहे. त्याऐवजी पर्यायी देशांकडून माल घेण्याचे आवाहन संघटनेने व्यापाऱ्यांना केले आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील 103 वाडे अतिधोकादायक, महापालिकेकडून सर्वेक्षण
Pune News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे तसेच जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहराच्या हद्दीत 136 इमारती धोकादायक आहेत. त्यातील 103 इमारती अतिधोकादायक असून राहण्यास योग्य नसल्याचे घोषित केल आहे. अतिधोकादायक 77 ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे आले समोर आहे.
वी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये १५ दिवसांसाठी ड्रोन उडविण्यावर बंदी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण शहरात पुढील 15 दिवस ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. उरणमधील जेएनपीटी बंदर, ओएनजीसी प्रकल्प, तसेच वायू व तेलसाठ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष खबरदारी घेतली गेली आहे.
पुण्यात आता मसाले-सुकामेवा संघटनेचाही तुर्कीच्या मालावर बहिष्कार
पुण्यात आता मसाले-सुकामेवा संघटनेचाही तुर्कीच्या मालावर बहिष्कार.
भारताविरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तुर्कीच्या मालावर मसाले आणि सुकामेवा संघटनेने ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कारानंतर आता मसाले आणि सुकामेवा व्यापाऱ्यांनी 'बॅन तुर्की'चा अवलंब केला आहे.
भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला आहे. त्याऐवजी पर्यायी देशांकडून माल घेण्याचे आवाहन संघटनेने व्यापाऱ्यांना केले आहे.
66 पुण्यातील सर्व व्यापार्ह निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. आम्ही आपल्या देशाच्या हितासाठी तुर्कीहून कोणत्याही वस्तू आयात करणार नाही आणि त्या विकणारही नाही
रत्नागिरी जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली तसेच आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच जिल्ह्यासाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे असणार आहेत, कारण जिल्ह्यात 18 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. तसेच कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर, विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत पुन्हा हलगर्जीपणा समोर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील Route 93 या चायनीज गाळ्यात हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप
विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असताना घडलं धक्कादायक प्रकार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश, समिती स्थापन करत करण्यात येणार चौकशी
तुळजापूर तालुक्यातील हाणोळा येथील तरुणाचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू
तुळजापूर तालुक्यातील हाणोळा येथील तरुणाचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू
सोमनाथ प्रकाश कोरे असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव
रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून प्रकाश झोपला मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
झोपेत असताना प्रकाश ओरडला, आई-वडिलांनी धाव घेतली मात्र तो उठलाच नाही
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले
एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना खंडणी मागून ठार मारण्याची धमकी
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना दहा लाखाची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी, काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
ऑपरेशन 'सिंदूर'चा परिणाम, संरक्षण बजेट वाढणार?
ऑपरेशन 'सिंदूर'चा परिणाम, संरक्षण बजेट वाढणार?
सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकास यासाठी तरतूद केली जाणार आहे. हा खर्च नवीन शस्त्रे आणि दारूगोळा आणि तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च केला जाईल. 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदीचा प्रस्ताव असेल. हिवाळी अधिवेशनात अतिरिक्त निधीसाठी मंजुरी मिळू शकते. यावर्षी संरक्षण बजेट विक्रमी 6.81 लाख कोटी रुपये होते.
मोदी सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षांत संरक्षण बजेटमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षण बजेटमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये संरक्षण बजेट 2.69 लाख कोटी होते. यावेळी ते ६.८१ लाख कोटी रुपये आहे, जे एकूण बजेटच्या 13.45 टक्के आहे. इतर सर्व मंत्रालयांमध्ये संरक्षणाचे बजेट सर्वाधिक आहे.
साडेचार लाखांचा खतांचा अनधिकृत साठा जप्त, धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई
धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. साडेचार लाखांचा खतांचा अनधिकृत साठा कृषी विभागाने केला जप्त. विनापरवाना खतांची साठवणूक करणाऱ्या दत्तात्रय तावरे, विकास होळे या दोघांविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथे कुक्कुटपालन शेडमध्ये विना परवाना करण्यात आली होती खतांची साठवणूक. तब्बल 20 टन रासायनिक खतांचा साठा जप्त, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवणार. कृषी विभागाच्या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले.
पुण्यात २४ लाखांची बनावट दारू जप्त
पुण्यात २४ लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. पुणे-मुंबई हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. २४ लाख रुपयांची गोवा बनावट दारूचे 305 बॉक्स उत्पादन शुल्क विभागाने केले जप्त.
नीरव मोदीची जामीन याचिका लंडनमध्ये फेटाळली
नीरव मोदीची जामीन याचिका लंडनमध्ये फेटाळली
लंडनच्या हाय कोर्टऑफ जस्टीस, किंग्ज बेंच डिव्हिजनने नीरव दीपक मोदीची फ्रेश जामीन याचिका फेटाळली. क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या वकिलांनी जामीन याचिकेचा तीव्र विरोध केला, ज्यांना CBI च्या तपास व कायदा अधिकाऱ्यांच्या मजबूत टीमने सहकार्य केले. नीरव मोदी 19 मार्च 2019 पासून UK च्या तुरुंगात आहे. तो पंजाब नॅशनल बँकेच्या 6498.20 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आर्थिक गुन्हेगार आहे. भारत सरकारच्या बाजूने UK उच्च न्यायालयाने त्याचा प्रत्यार्पण आदेश आधीच मंजूर केला आहे.
जळगाव शहरातील तुकाराम वाडीसह दशरथ नगर परिसरात टोळक्याकडून घरांसह वाहनांवर दगडफेक
जळगाव शहरातील तुकाराम वाडी व दशरथ नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 15 ते 20 जणांच्या टोळक्याने अनेक घरांवर दगडफेक केली असून चार चाकी सह दुचाकीची ही तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 15 ते 20 टोळक्याने धारदार शस्त्रासह घरांवर हल्ला चढवण्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून या घटनेचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेमुळे तुकाराम वाडीसह दशरथ नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.