जाहिरात

Dr. Babasaheb Ambedkar : पुस्तकाला स्पर्श करण्याची नव्हती परवानगी, बाबासाहेबांनी उभी केली आशियातील सर्वात मोठी लायब्ररी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : एक किस्सा असा आहे जो केवळ बाबासाहेबांची वेदना दर्शवत नाही तर त्यांच्यातील असाधारण सामर्थ्य आणि ज्ञानाची भुकही दाखवतो. 

Dr. Babasaheb Ambedkar : पुस्तकाला स्पर्श करण्याची नव्हती परवानगी, बाबासाहेबांनी उभी केली आशियातील सर्वात मोठी लायब्ररी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : आज 14 एप्रिल. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, समाज सुधारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांच्या आयुष्यातील अनैक पैलू प्रेरणेने ओतप्रोत भरलेले आहेत. मात्र एक किस्सा असा आहे जो केवळ त्यांची वेदना दर्शवत नाही तर त्यांच्यातील असाधारण सामर्थ्य आणि ज्ञानाची भुकही दाखवतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लहानपणी जेव्हा डॉ. बाबासाहेब शाळेत जात होते. तेव्हा त्यांना वर्गात बसण्यासाठी चटईही दिली जात नव्हती. पावसाळ्यात तर चिखलात बसून त्यांना अभ्यास करावा लागत होता. जातीवाद इतका खोल रुतला होता की, शाळेत उच्च जातीचे विद्यार्थी किंवा शिक्षक त्यांना स्वत:च्या हाताने पुस्तक देत नव्हते. तर पुस्तक देण्यासाठी ते छडी किंवा काठीचा उपयोग करीत होते. महार जातीतीला व्यक्तीचा स्पर्श होऊ नये हा त्यामागील उद्देश. हा किस्सा बाबासाहेबांनी आपली आत्मकथा Waiting For a Visa यामध्ये लिहिला आहे. यावरुन आपल्या लक्षात येतं की, लहानपणी त्यांना स्पृश-अस्पृश्य आणि जातीभेदाचा कोणत्या पातळीपर्यंत सामना करावा लागला. 

Ambedkar Jayanti 2025: आंबेडकर जयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली? काय आहे पुणे कनेक्शन? जाणून घ्या इतिहास

नक्की वाचा - Ambedkar Jayanti 2025: आंबेडकर जयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली? काय आहे पुणे कनेक्शन? जाणून घ्या इतिहास

पुस्तकाला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती...

ज्या मुलाला पुस्तकाला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, त्याच मुलाने भविष्यात आशियातील सर्वात मोठी खासगी लायब्ररी उभी केली. मुंबईतील निवासस्थान राजगृहमध्ये त्यांच्याजवळ 50 हजार पुस्तकं होती. ही पुस्तकं त्यांनी जगभरातून मागवली होती. यामध्ये अर्थकारण, राजकारण, समाजशास्त्र, धर्म, कायदा यापासून साहित्यापर्यंत प्रत्येक विषयाची पुस्तकं होती. 

आठ वर्षांचं शिक्षण दोन वर्षात केलं पूर्ण



एकदा ते म्हणाले होते की, माझी खरी संपत्ती ही पुस्तकं आहेत. यावरुन त्यांची ज्ञानाबद्दलची ओढ लक्षात येते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना त्यांनी आठ वर्षांचा अभ्यासक्रम केवळ दोन वर्षात पूर्ण केला होता.