दुबईच्या राजकुमारीनं नवऱ्याला इन्स्टाग्राम पोस्टवरुन जाहीरपणे घटस्फोट दिला होती. दुबईच्या राजकुमारी शेखा महरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी नवरा शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम यांच्यापासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. शेखा महरा यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची जगभर चर्चा होती. शेखा महरा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
इंन्स्टाग्राम पोस्ट
राजकुमारी शेखा महरा यांनी Divorce नावाचा परफ्युम लॉन्च केला आहे. शेखा यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या ब्रँड महारा एम 1 अंतर्गत परफ्यूमचा टीझर शेअर केला होता. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होती. एका काळ्या रंगाच्या सुंदर काळ्या रंगाच्या बाटलीमध्ये हा परफ्युम आहे.
सोमवारी शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये तुटलेल्या काचा, गडद काळ्या रंगाच्या पाकळ्या आणि छोटे काळे दगड दिसत होते. शेखा महरा यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर Divorce नावाचा परफ्युम लाँच केला आहे. शेखा महराने मे 2023 मध्ये उद्योगपती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी विवाह केला होता.
शेखा महरा यांची तलाक पोस्ट?
शेखा महरा यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'प्रिय पती, तुम्ही इतरांसोबत व्यस्त आहात. त्यामुळे मी तुम्हाला तलाक देत असल्याची घोषणा करत आहे. मी तुम्हाला तलाक देत आहे. तलाक देत आहे, आणि तलाक देत आहे. स्वत:ची काळजी घ्या. तुमची माजी पत्नी.'
कोण आहेत शेखा महरा?
शेख महारा या दुबईचे राज्यकर्ते, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कन्या आहेत. त्या महिलांच्या हक्काच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांनी ब्रिटनमधील विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदवी पूर्ण केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world