जाहिरात

इलॉन मस्कला भारतातील निवडणुकांची भुरळ, स्तुती करत म्हटलं...

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र कॅलिफोर्नियामध्ये अद्याप सर्व मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही.

इलॉन मस्कला भारतातील निवडणुकांची भुरळ, स्तुती करत म्हटलं...
नई दिल्‍ली:

टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीची भुरळ पडली आहे. भारतीय निवडणूक पद्धतीचं कौतुक करताना त्यांना अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

एका यूजरने सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यात ज्यामध्ये एका लेखाचे शीर्षक शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे, "भारताने एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी केली. हा चमत्कारापेक्षा कमी नाही. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले आहे. 

(नक्की वाचा-  Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?)

या पोस्टला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी लिहिले की, 'भारतात एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी झाली. पण कॅलिफोर्नियामध्ये मतांची मोजणी अजूनही सुरू आहे.' अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन 2 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत एका सोशल मीडिया यूजरने पोस्टही केली आहे. 

(नक्की वाचा-  Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी)

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र कॅलिफोर्नियामध्ये अद्याप सर्व मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही. कॅलिफोर्नियामध्ये 1.6 कोटी लोकांनी मतदान केले. यामध्येही मोठ्या संख्येने लोकांनी मेलद्वारे मतदान केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com