कुवेतमधील मंगाफ शहरात इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 भारतीय मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक कामगार जखमी असल्याची माहिती आहे. कामगारांना या इमारतीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेतच्या मंगाफमधील एका 6 मजली इमारतीमधील किचनला आग लागली होती. अनेकांचा मृत्यू गुदमरुन झाल्याची माहिती समोर येत आहे.
कुवैत टाईम्सच्या माहितीनुसार, इमारतीत एका कंपनीतील जवळपास 160 लोक राहत होते. यापैकी बरेच कर्मचारी हे भारतीय होते. भारतीय वेळेनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजता ही आग लागली. तळमजल्याच्या किचनमध्ये ही आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. त्यामुळे आतमध्ये अनेक कर्मचारी अडकले. अनेकजण अनधिकृतरित्या राहत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
(नक्की वाचा- डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव)
कुवेतमधील भारतीय दूतावासने सोशल मीडिया पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. भारतीय मजुरांसंबंधित एक दु:खद घटना समोर आली आहे. यासाठी +965-65505246 हा इमर्जन्सी नंबर जारी करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. दूतावास शक्य ती मदत करण्यास कटिबद्ध आहे.
In connection with the tragic fire-accident involving Indian workers today, Embassy has put in place an emergency helpline number: +965-65505246.
— India in Kuwait (@indembkwt) June 12, 2024
All concerned are requested to connect over this helpline for updates. Embassy remains committed to render all possible assistance. https://t.co/RiXrv2oceo
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं ट्वीट
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ‘X' वर एक पोस्ट करत म्हटलं की, "कुवैतमध्ये लागलेल्या आगीची घटना दु:खद आहे. यामध्ये जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आपले राजदूत घटनास्थळी असून अधिक माहिती घेत आहेत.”
(नक्की वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात तिसरा दहशतवादी हल्ला, डोडामधील लष्कराची चौकी निशाण्यावर)
Amb @AdarshSwaika visited the Al-Adan hospital where over 30 Indian workers injured in today's fire incident have been admitted. He met a number of patients and assured them of full assistance from the Embassy. Almost all are reported to be stable by hospital authorities. pic.twitter.com/p0LeaErguF
— India in Kuwait (@indembkwt) June 12, 2024
कुवेतचे गृहमंत्री शेख फहद अल युसूफ-अल -सबह यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीच्या पैशांच्या लालसेपोटी अशा घटना घडतात. जास्तीच्या भाड्यासाठी मालक मर्यादेपेक्षा जास्त लोकांना इथे राहण्याची परवानगी देतात. जास्तीच्या भाड्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world